रातोरात करोडपती बनवेल हा एक छोटा मासा; दिसताच पकडा, यात काय आहे खास?
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
पृथ्वीवर असे अनेक प्राणी आहेत ज्यांचं मूल्य खूप जास्त आहे. पण आज आम्ही तुम्हाला त्या माशांबद्दल सांगणार आहोत, ज्यातील तुम्ही एकाला सुद्धा पकडलं तर ते तुम्हाला करोडपती बनतील. ते विकून तुम्ही एक कार आणि बंगला देखील खरेदी करू शकाल. परंतु त्यांना ओळखणं आणि शोधणं खूप कठीण आहे.
या यादीत प्लॅटिनम आरोवाना पहिल्या क्रमांकावर आहे. याला आशियाई आरोवाना असेही म्हणतात. तुम्ही ते एक्वॅरियममधून विकत घेऊ शकता, परंतु तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल. एका माशाची किंमत 3 कोटींहून अधिक आहे. हे म्यानमार, फिलीपिन्स, इंडोनेशिया, कोलंबिया आणि ब्राझील यांसारख्या दक्षिण अमेरिकन देशांमध्ये आढळतात. राखाडी रंगाचा दिसणारा हा मासा आता जवळपास नाहीसा होत आला असला तरी तो 60 वर्षे जगू शकतो.
advertisement
advertisement
advertisement
गोल्डन बॅस्लेट सोनेरी केशरी रंगात दिसते. क्युबाजवळील समुद्रात आढळणाऱ्या या माशावर काही जांभळ्या आणि काळ्या रंगाच्या खुणा आहेत. मात्र, ते अगदी लहान आहे आणि तीन इंचांपेक्षा कमी वाढतात. हे खरेदी करण्यासाठी तुम्हाला 8000 डॉलर्स म्हणजेच अंदाजे 66 लाख रुपये खर्च करावे लागतील. म्हणजे 22 लाख रुपये प्रति इंच.
advertisement
गोल्डन एलिगेटर गार एक चमकदार सोनेरी पिवळा-केशरी रंगाचा मासा आहे. त्याची किंमत 7000 डॉलर्स म्हणजे अंदाजे 58 लाख रुपये आहे. सहसा ते 6 फुटांपर्यंत वाढतात. 10,000 पैकी फक्त एक अॅलिगेटर गार हा दुर्मिळ सोनेरी रंगाचा असल्याचं दिसून येतं. त्यांचे दात खूप तीक्ष्ण असतात. तरीही, ते मानवांसाठी धोकादायक नाही. कोणीतरी आपली अंडी खात असल्याची भीती वाटल्यावरच तो हल्ला करतो.
advertisement