TRENDING:

शेरू घालणार शेरवाणी! मुलीच्या लग्नात कुत्र्याला शिवले कपडे; मालकाने खर्च केले 10000 रूपये...

Last Updated:

राजेश मावळे यांनी आपल्या मुलीच्या लग्नात कुत्रा शेरूला मानाचं स्थान दिलं आहे. चार वर्षांपासून सोबत असलेल्या शेरूला त्यांनी आपल्या मुलासारखं मानलं असून त्याचं नावही...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मध्य प्रदेशातील बुरहानपूरमध्ये एका कुत्र्याच्या मालकाने टेलरच्या दुकानात जाऊन अशी मागणी केली की, लोक त्याच्याकडे बघतच राहिले. इंदिरा कॉलनीत राहणारे राजेश मावळे गेल्या 4 वर्षांपासून शेरू नावाचा कुत्रा पाळत आहेत. आता हा शेरू चर्चेत आहे, कारण राजेश मावळेंच्या मुलीचं लग्न ठरलं आहे.
Dog wears sherwani
Dog wears sherwani
advertisement

या लग्नाच्या पत्रिकेत शेरूचं नावही छापण्यात आलं आहे. त्याच्यासाठी कपडेसुद्धा खरेदी केले आहेत. विशेष म्हणजे, शेरू यावेळी शेरवाणी घालणार आहे. राजेश सांगतात की, त्यांना दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. ते शेरूला आपल्या मुलांप्रमाणेच मानतात. त्यांच्या मुलीच्या लग्नात शेरू पाहुण्यांसोबत फिरणार आहे. त्याची तयारीही सुरू झाली आहे. त्याचे कपडे टेलरला शिवण्यासाठी दिले आहेत.

advertisement

10 हजार रुपयांचे कपडे खरेदी

घरातील लोक सांगतात की, जसे त्यांनी स्वतःसाठी दोन-तीन ड्रेस घेतले आहेत, तसेच शेरूसाठीही 10 हजार रुपयांचे कपडे खरेदी केले आहेत. शेरू लग्नात पाहुण्यांसोबत फिरणार आहे. त्यासाठी टेलरकडून त्याचे माप घेऊन कपडे शिवले जात आहेत. लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेत शेरूचं नावही छापण्यात आलं आहे, ज्यामुळे ही पत्रिका सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

advertisement

राजेश जेव्हा आपला कुत्रा शेरू सोबत टेलरच्या दुकानात पोहोचले...

तेव्हा टेलरला सुरुवातीला वाटलं की, राजेश काहीतरी कामासाठी आले असतील. पण, जसा त्यांनी कुत्र्यासाठी शेरवानी बनवायला सांगितली, तेव्हा टेलरला मोठा धक्का बसला. पहिल्यांदा त्याला हसू आवरवलं नाही, पण नंतर त्याने शेरूचं माप घेतलं आणि कुत्र्याच्या मापाची कपडे शिवण्यास सुरू केले.

हे ही वाचा : वाहतूक नियमांची ऐशी-तैशी! ई-रिक्षा झालीय मिनी बस; 22 प्रवाशांनी रस्त्यावर घातला हैदोस

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Agriculture Tips: शेतीला कीड-रोगांचा धोका, उन्हाळ्यात कशी घ्यावी काळजी? पाहा कृषी तज्ज्ञांचा सल्ला, Video
सर्व पहा

हे ही वाचा : 'या' पोरीला पिस्तूलसोबत Reel बनवणं पडणार महागात; VIDEO झाला व्हायरल, पोलिसांनी घेतली दखल

मराठी बातम्या/Viral/
शेरू घालणार शेरवाणी! मुलीच्या लग्नात कुत्र्याला शिवले कपडे; मालकाने खर्च केले 10000 रूपये...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल