अनोख लग्न आणि पाहुणे जमले 1000
तेलंगणातील कुमारंभीम आसिफाबाद जिल्ह्यातील लिंगापूर मंडळातील गुम्नूर गावातील एका तरुणाने आदिवासी प्रथा-परंपरेनुसार एकाच वेळी दोन महिलांशी विवाह केला. या अनोख्या विवाहाचे साक्षीदार गावात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण होते. मिळालेल्या माहितीनुसार, सूर्यदेव हैदराबाद येथील चित्रपट उद्योगात काम करतो. त्याचे सिरपूर (यू) मंडळातील शेट्टीहाडपनूर राजुलागुडा येथील कनक लालसोबत तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, त्यांचे संबंध बिघडले आणि त्याने तिच्यापासून दुरावा ठेवला.
advertisement
पंचायतीने जुळवले लग्न
दरम्यान, सूर्यदेवचे त्याच मंडळातील पुल्लारा गावातील आत्रम जलकार देवीसोबतही प्रेमसंबंध जुळले होते. जेव्हा कनक लालला याची माहिती मिळाली, तेव्हा तिने लग्नाचा हट्ट धरला आणि गावकऱ्यांच्या मदतीने पंचायत बोलावली. सूर्यदेव जलकार देवीला हैदराबादला घेऊन गेला, पण त्याच्या कुटुंबीयांनी हस्तक्षेप करून दुसरी पंचायत बोलावली.
दोघींनाही समान प्रेम देण्याचे बॉण्डवर लेखी आश्वासन
गावचे पटेल आणि माजी सरपंच आत्रम यांच्यासह गावकऱ्यांच्या उपस्थितीत सूर्यदेव दोन्ही महिलांशी लग्न करण्यास तयार झाला. तरुणाने पंचायतीसमोर एक बॉण्ड साइन केला, ज्यामध्ये त्याने दोन्ही नववधूंना समान काळजी आणि जबाबदारी देण्याचे वचन दिले. त्यानंतर 27 मार्च रोजी आदिवासी प्रथा-परंपरेनुसार एकाच ठिकाणी या तिघांचे एकत्रित लग्न झाले. यासाठी पत्रिका वाटण्यात आल्या होत्या आणि गावात फ्लेक्स बोर्डही लावण्यात आले होते. या अनोख्या विवाह सोहळ्याला तीन गावांतील सुमारे 1000 लोकांनी हजेरी लावली होती.
हे ही वाचा : Eid 2025 : मुस्लिम समाजात पुरुष पांढरी जाळीदार टोपी का घालतात?
हे ही वाचा : सासरला ही बहीण निघाली! ताईच्या लग्नासाठी स्वर्गातून आला मृत भाऊ, चमत्कारिक VIDEO