advertisement

सासरला ही बहीण निघाली! ताईच्या लग्नासाठी स्वर्गातून आला मृत भाऊ, चमत्कारिक VIDEO

Last Updated:

Dead brother at sisters wedding : एक नवरी जिच्या लहान भावाचा मृत्यू झाला होता पण बहिणीच्या लग्नाला मात्र मृत भाऊ आवर्जून आला. तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल. हे कसं शक्य आहे, यावर विश्वासच बसत नसेल. पण हा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होतो आहे.

News18
News18
नवी दिल्ली : लग्न हा प्रत्येकासाठी खास क्षण असतो आणि या खास क्षणात आपल्या आयुष्यातील प्रत्येक जवळची, प्रिय वयक्ती असावी असं प्रत्येकाला वाटतं. एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर या अशा आनंदाच्या क्षणी त्या व्यक्तीची आठवण येतेच. ती मृत व्यक्ती या खास क्षणी खरंच आली तर... असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
एक नवरी जिच्या लहान भावाचा मृत्यू झाला होता पण बहिणीच्या लग्नाला मात्र मृत भाऊ आवर्जून आला. तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल. हे कसं शक्य आहे, यावर विश्वासच बसत नसेल. पण हा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होतो आहे.
लग्नात सगळे जण आनंदी आहेत. वधू आणि वर देखील खूप आनंदी दिसत आहेत. अचानक संपूर्ण कुटुंब एका मोठ्या पडद्यासमोर जमतं आणि लग्नाची फिल्म सुरू होते. या फिल्ममध्ये चक्क वधूचा मृत भाऊ दिसतो. तो एक-एक करून सर्वांसोबत फोटो काढतो आणि आपल्या बहिणीलाही भेटतो. फ्रेममध्ये हा एक असा सीन होता ज्याने सर्वांना हादरवून टाकलं. सगळ्यांनाच रडू कोसळलं.
advertisement
advertisement
हा क्षण पाहून लग्नात आलेली प्रत्येक व्यक्ती रडलीच पण व्हिडीओ पाहणाऱ्यालाही अश्रू आवरता आले नाही. असा भावनिक क्षण त्यांनी यापूर्वी कधीही पाहिला नसल्याची प्रतिक्रिया देत आहेत.
हा इमोशनल व्हिडिओ pawan_comedian_tijara नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे. आता हे कसं शक्य झालं? तर एआयमुळे.  एआयच्या मदतीनेही, वधूच्या कुटुंबाचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं.
view comments
मराठी बातम्या/Viral/
सासरला ही बहीण निघाली! ताईच्या लग्नासाठी स्वर्गातून आला मृत भाऊ, चमत्कारिक VIDEO
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement