आश्चर्यम! डोकं कापलं तरी 18 महिने कोंबडा जिवंत, पण कसा काय?

Last Updated:

Headless chicken : एका कोंबड्याने डोकं नसताना 18 महिने जगून इतिहास रचला. ज्याला लोक अजूनही 'हेडलेस चिकन' म्हणून ओळखतात. त्याची अनोखी कहाणी जाणून घेऊया.

News18
News18
नवी दिल्ली : कोणताही माणूस किंवा प्राणी डोक्याशिवाय जगू शकतो यावर तुम्ही विश्वास ठेवू शकाल का? पण आम्ही तुम्हाला सांगतो की असा चमत्कार सुमारे 80 वर्षांपूर्वी घडला होता. हे विचित्र वाटतंय, पण ते खरं आहे. अमेरिकेतील कोलोरॅडोमध्ये एका कोंबड्याने 18 महिने डोकं नसताना जगून इतिहास रचला. या अनोख्या कोंबड्याचं नाव 'माइक' होतं, ज्याला लोक अजूनही 'हेडलेस चिकन' म्हणून ओळखतात.
सप्टेंबर 1945 ची ही घटना. अमेरिकेच्या कोलोरॅडोमधील एका शेतात जिथं लॉयड ओल्सन आणि त्यांची पत्नी क्लारा कोंबडी कत्तल करणारे म्हणून काम करायचे. त्यांनी अनेक कोंबड्या कापल्या, पण त्यापैकी एक जिवंत राहिली. त्याचं डोकं कापलं गेलं तरी तो चालत राहिला. हे दृश्य पाहून ओल्सन कुटुंबाला धक्का बसला.
advertisement
ओल्सन माईकची काळजी घेऊ लागला. त्याला नळीतून पाणी आणि अन्न द्यायचा. माईकच्या श्वासनलिकेमध्ये साचलेला श्लेष्मा काढण्यासाठी सीरिंजचा वापरही करण्यात आला.
माइक प्रसिद्ध झाला
जेव्हा आजूबाजूच्या लोकांना माईकच्या चमत्काराबद्दल कळलं तेव्हा ही बातमी वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध होऊ लागली. लवकरच माइक एक सेलिब्रिटी बनला आणि त्याला अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये नेण्यात आलं. एवढंच नाही तर माइकला पाहण्यासाठी लोक दूरदूरून येऊ लागले. तो अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरत राहिला आणि बातम्यांमध्ये हेडलाइन बनत राहिला. या अनोख्या कोंबड्यामुळे ओल्सन कुटुंबाने खूप पैसे कमावले आणि त्यांचे जीवन सुधारले.
advertisement
एप्रिल 1947 मध्ये एका रात्री माइक अ‍ॅरिझोनाच्या फिनिक्स इथं दौऱ्यावर असताना त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. ओल्सन कुटुंबाने लगेच सीरिंज शोधण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने त्यांच्याकडे ती नव्हती. परिणामी कफ जमा झाल्यामुळे माइकचा गुदमरून मृत्यू झाला. ओल्सनने हे अनेक वर्षे गुप्त ठेवलं आणि लोकांना सांगितलं की त्याने माइक दुसऱ्याला विकला आहे. पण नंतर सत्य बाहेर आलं.
advertisement
माइकच्या स्मरणार्थ दरवर्षी कोलोरॅडोमधील फ्रुइटा शहरात 'माइक द हेडलेस चिकन फेस्टिव्हल' साजरा केला जातो. या महोत्सवात 5 किलोमीटर धावण्याची शर्यत, संगीत, खेळ आणि हेडलेस चिकन-थीम असलेले कार्यक्रम समाविष्ट आहेत. त्याची कहाणी एका चित्रपटातही दाखवण्यात आली आहे.
डोक्याशिवाय कसा जिवंत राहिला माइक?
शास्त्रज्ञांच्या मते कोंबडीचा मेंदू मागच्या बाजूला असतो. जेव्हा ओल्सनने माईकचं डोकं कापलं तेव्हा त्याच्या मेंदूचा आणि घशाचा काही भाग तसाच राहिला, ज्यामुळे तो जिवंत राहू शकला. सुदैवाने रक्तप्रवाहही लवकर थांबला, त्यामुळे जास्त रक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यू झाला नाही.
view comments
मराठी बातम्या/Viral/
आश्चर्यम! डोकं कापलं तरी 18 महिने कोंबडा जिवंत, पण कसा काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement