मोर आणि बदकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका शेतात एक बदक बसलेला आहे. त्याच्यासमोर मोर आहे. मोर त्या बदकाला लांडोर समजतो. जसा तो बदकाला पाहतो तसा आपल्या रंगीत शेपटीचा पिसाराला फुलवतो. हे तो लांडोरला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी करत असतो. मोर पिसारा फुलवून बदकासमोर नाचतो. बदक मात्र शांत बसलेलं असतं. त्याला मात्र याची काहीच पडलेली नाही. मोर बदकावर बसतो. पण बदक त्याच्यापासून दूर जातो.
advertisement
@yipinshuageliyingjun या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. मोराच्या बदकासोबतच्या प्रेमाने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं.
Video : कोंबडीच्या प्रेमात पडला मोर, संबंधही ठेवले, जन्माला आलं असं पिल्लू की विश्वासच बसणार नाही
एका युझरने कमेंट केली, 'हा कलियुगाचा परिणाम आहे, मोरालाही मोर आणि बदकामधील फरक माहित नाही!' दुसऱ्याने लिहिलं, 'आता त्यांना मुले कशी होतील? मोर-बदकाचा संकर?', काही युझर्सनी याला निसर्गाचा मजेदार खेळ म्हटलं, तर काहींनी मोराच्या गैरसमजाची खिल्ली उडवली.