एका चिनी व्यक्तीने मॉलचे घरामध्ये रूपांतर केलं. सहा महिने तो मॉलमध्येच राहिला. पण नंतर त्याला अटक करून त्याला मॉलमधून हाकलण्यात आलं. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे हा चिनी व्यक्ती गेल्या 6 महिन्यांपासून येथे राहत होता, मात्र त्याची कोणालाच माहिती नव्हती.
VIDEO : दीड वर्षांचा नातू खेळत होता, आजोबांच्या कारखाली चिरडला; अंगावर काटा आणणारी घटना
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, या चिनी व्यक्तीने अतिशय हुशारीने पायऱ्यांखाली तंबू ठोकला. मंडपासोबतच टेबल, खुर्ची आणि कॉम्प्युटरही त्यांनी बसवले होते. हा माणूस गेल्या 6 महिन्यांपासून शॉपिंग सेंटरच्या आउटलेटचा वापर करत होता आणि त्याची इलेक्ट्रॉनिक उपकरणे चार्ज करत होता. काही महिन्यांपूर्वी, मॉल सिक्युरिटीने तंबूत राहणार्या व्यक्तीला पकडले, परंतु नंतर त्याला तेथे राहण्याची परवानगी देण्यात आली. सुरक्षा कर्मचार्यांनी त्यांना येथे राहण्याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितलं की, तो अभ्यासासाठी शांत जागा शोधत आहे, म्हणून येथे राहण्यासाठी आलो आहे. असं सांगितल्यानंतर त्या व्यक्तीला येथे राहण्याची परवानगी मिळाली.
त्या व्यक्तीला वाटलं की त्याची चिंता आणि त्रास कमी झाला आहे. मात्र, एके दिवशी म्हणजेच 30 ऑक्टोबर रोजी मॉलच्या सुरक्षा रक्षकाने त्याला पाहिलं आणि चिनी माणसाला अटक करण्यात आली.