व्यक्तीचा हृदयाचा ठोका चुकवणारा स्टंट व्हिडीओ सध्या इंटरनेटवर जोरदार व्हायरल होतोय. 30 वर्षीय व्यक्तीनं इमारतीच्या 68 व्या मजल्यावर चढून स्टंट केला. मात्र पुढे त्याच्यासोबत भयानक घडलं.
VIDEO : व्यक्तीनं माकडाबरोबर खाल्लं कलिंगड; क्युट व्हिडीओनं जिंकलं मन
ही घटना हाँगकाँगमध्ये फ्रेंच डेअरडेव्हिल रेमी लुसिडीसोबत घडली. 30 वर्षीय लुसिडी हा स्टंट करत होता, त्यादरम्यान ट्रेगंटर टॉवर कॉम्प्लेक्सच्या पेंट हाऊसच्या बाहेर अडकला. घाबरून त्यानं खिडकीवर हात-पाय मारायला सुरुवात केली, ज्यामुळे आतील मोलकरीण घाबरली. त्यानंतर त्याचा इमारती
advertisement
हाँगकाँगच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लुसीडी रविवारी संध्याकाळी 6 वाजता इमारतीत घुसले होते. 40 व्या मजल्यावर मित्राला भेटायला आल्याचं त्यानं सुरक्षा रक्षकाला सांगितलं. त्यानंतर लुसीडीनं लिफ्टमधून जाऊन स्टंटही सुरु केला होता. विचारपूस केल्यावर गार्ड त्याला ओळखत नसल्याचं उघड झालं. इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये तो स्टंटबाजी करताना दिसला.
दरम्यान, लुसीडीला शेवटचा संध्याकाळी 7.30 वाजता पेंटहाऊसच्या खिडकीवर हात मारताना दिसला होता. त्यानंतर मोलकरणीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना तेथून लुसीडीचा कॅमेरा सापडला आहे. त्यात डेअरडेव्हिलच्या स्काय स्क्रॅपर्सवर शूट केलेले धोकादायक व्हिडिओ होते.
