VIDEO : व्यक्तीनं माकडाबरोबर खाल्लं कलिंगड; क्युट व्हिडीओनं जिंकलं मन

Last Updated:

इंटरनेटवर विविध प्रकारच्या व्हिडिओ क्लिप व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ प्राण्यांशी संबंधित असतात. काही व्हिडिओंमध्ये प्राणी आणि माणूस यांच्यातील परस्परसंवाद दिसून येतो.

क्युट व्हिडीओ
क्युट व्हिडीओ
नवी दिल्ली, 31 जुलै :  इंटरनेटवर विविध प्रकारच्या व्हिडिओ क्लिप व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ प्राण्यांशी संबंधित असतात. काही व्हिडिओंमध्ये प्राणी आणि माणूस यांच्यातील परस्परसंवाद दिसून येतो. माणूस आणि प्राण्यांचे काही व्हिडिओ बघून आपल्याला हसू आवरत नाही तर काही व्हिडिओंमधून नात्यांतील प्रेमळपणा दिसतो. सध्या अशीच एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. एक माकड आणि एका व्यक्तीची ही क्लिप आहे. 'हिंदुस्थान टाइन्स'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
या हृदयस्पर्शी व्हिडिओमध्ये मध्यमवयीन पुरुष आणि माकड यांच्यातील सुंदर बंध दिसून येत आहे. या व्हिडिओतील व्यक्ती एक टरबूज माकडासोबत वाटून खात आहे. ही एक साधी पण हृदयस्पर्शी कृती आहे.
Buitengebieden नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. "एकत्र टरबूज खात आहोत," असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलेलं आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला एक व्यक्ती आणि एक माकड समोरासमोर टरबूज घेऊन बसलेले दिसत आहेत. व्हिडिओ जसजसा पुढे जातो तसतसं ती व्यक्ती सुरीने कापून टरबूजाचे दोन तुकडे करते आणि त्यातील एक तुकडा माकडाला खाण्यासाठी देते. त्यानंतर दोघे मिळून त्या रसाळ फळाचा आनंद घेतात.
advertisement
ट्विटरवर शेअर केल्यानंतर काही तासांतच या व्हिडिओला 1.5 दशलक्षांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि ही संख्या अजूनही वाढत आहे. अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
"क्युट! मित्रांनो, केळी विसरू नका," अशी कमेंट एका ट्विटर युजरनं केली तर आणखी एकजण म्हणाला, "किती छोटासा गोंडस जीव आहे! तो अतिशय धीरानं टरबूजाची वाट पाहत होता." आणखी एका यूजरनं कमेंट केली की, "ते माकड किती शांतपणे आणि कुतूहलाने पाहतंय की तो माणूस टरबूज कसं कापतोय, जणू काही एखाददिवस त्या माकडालाच टरबूज कापावं लागणारे अर्थात खऱ्या सुरीने नव्हे, एलओएल!" "माकडाने टरबूजाचा चांगला भाग खाल्ला, संयमाचं बक्षीस, जग कसं असावं, शेअरिंग आणि केअरिंग. माकडालाही टरबुजाचा चांगला भाग दिला," अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.
advertisement
माणूस आणि माकडाची मैत्री नवीन गोष्ट नाही. पण, भूक लागल्यानंतर किंवा माणसाच्या हातात खाद्यपदार्थ असल्यानंतर माकडं आक्रमक होतात. ते तो खाद्यपदार्थ हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, या व्हिडिओतील माकड याला अपवाद ठरलं आहे. त्यानं संयमानं आपल्याला टरबूज मिळण्याची वाट बघितली.
view comments
मराठी बातम्या/Viral/
VIDEO : व्यक्तीनं माकडाबरोबर खाल्लं कलिंगड; क्युट व्हिडीओनं जिंकलं मन
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement