Viral News: लहान मुलांच्या झुल्यात अडकली महिला, तासभरानंतर शेवटी....
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
लहान मुलांना खेळवताना अनेकदा मोठेही लहान होतात. लहान मुलांना खेळायला यावं म्हणून आई-वडिल त्यांना मॉलमध्ये, घराच्या बागेत, पार्कमध्ये घेऊन जात असतात.
नवी दिल्ली, 31 जुलै : लहान मुलांना खेळवताना अनेकदा मोठेही लहान होतात. लहान मुलांना खेळायला यावं म्हणून आई-वडिल त्यांना मॉलमध्ये, घराच्या बागेत, पार्कमध्ये घेऊन जात असतात. मात्र लहान मुलांना खेळवताना स्वतःही लहान बननं अनेकदा महागात पडतं. असाच एक प्रकार एका महिलेसोबत घडला. तिला लहान मुलांच्या झोक्यावर बसण्याचा मोह आवरला नाही. मोहाच्या भरात ती झोक्यावर बसली खरी पण तिच्यासोबत भलतंच घडलं.
महिला मुलांना घेऊन पार्कमध्ये गेली. लहान मुले पार्कमध्ये मस्त झोका खेळत होती. मुलांना झोका खेळताना पाहून महिलेला आपला मोह आवरला नाही. तीदेखील लहान मुलांच्या झुल्यावर बसली आणि अडकली.
ही घटना एसेक्सच्या साउथेंडची आहे. येथे राहणारी लेले वनबेस्ट नावाची महिला आपल्या मुलीसह पार्कमध्ये गेली होती. तिथे सगळे मिळून खूप एन्जॉय करत होते. लेलाने आपल्या मुलीला झुल्यावर डोलताना पाहिले तेव्हा तिलाही लहान मुलासारखे खेळावं वाटलं. मोहाच्या भरात ती लहान मुलांच्या झोक्यात बसली. 22 वर्षांची लेले मुलांच्या झुल्यावर बसली आणि खेळू लागली. सुमारे 10 मिनिटे झोके घेतल्यानंतर ती झोक्यात अडकली.
advertisement
सुरुवातीला तिनं स्वत:ला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ते शक्य झालं तेव्हा तिनं आपल्या मित्रांची आणि अगदी अनोळखी लोकांना मदत मागितली. सुमारे 1 तास सर्वांनी मिळून लीलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण काहीही उपयोग न झाल्यानं अखेर आपत्कालीन क्रमांकावर कॉल करण्यात आला आणि अग्निशमन दलाचे जवान तेथे पोहोचले, ज्यांनी लीलाची मदत केली.
view commentsLocation :
First Published :
July 31, 2023 1:32 PM IST


