डिलिव्हरी द्यायला आलेल्या व्यक्तीला घरासमोर दिसला पूल, केलं असं काही....
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
आजकाल इंटरनेटच्या जगात सर्व काही ऑनलाईन झालं आहे. वस्तूपांसून खाण्यापर्यंत सर्वच ऑनलाईन ऑर्डर करता येतंय.
नवी दिल्ली, 31 जुलै : आजकाल इंटरनेटच्या जगात सर्व काही ऑनलाईन झालं आहे. वस्तूपांसून खाण्यापर्यंत सर्वच ऑनलाईन ऑर्डर करता येतंय. ऑनलाईन ऑर्डर केलेल्या गोष्टी व्यवस्थितरित्या दिलेल्या पत्त्यावर पोहोचवण्याचं काम डिलिव्हरी बॉय करतात. डिलिव्हरी बॉयच्या अनेक घटना समोर येत असतात. कोणी काय केलं, त्यांचं गैरवर्तन, अशा सर्व घटना सोशल मीडियावर चर्चेत येतात. सध्या अशाच एक डिलिव्हरी बॉय चर्चेत आला आहे. ज्यानं ऑर्डर द्यायला गेल्यावर जे केलं ते पाहून तुम्हीही हसाल. याचा व्हिडीओही समोर आला आहे.
डिलिव्हरी बॉयला ऑर्डर द्यायला गेल्यावर घरासमोर स्विमिंग पूल दिसतो. मग काय त्याला पूलमध्ये जाण्याचा मोह आवरत नाही. तो ऑर्डर दिल्यावर लगेच स्विमिंग पूलकडे येतो आणि त्यामध्ये पोहायला लागतो.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, डिलिव्हरी बॉय घराचा पत्ता शोधत येतो. तो सुरुवातीला पत्ता बघत इकडे तिकडे जाताना दिसतो. नंतर पार्सल ठेवताच तो पूलाकडे येतो आणि पाण्यात सूर घेतो. हा व्हिडीओ @jimijamm नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.
advertisement
An Amazon Driver Goes for a Swim in Somebody's Pool
A homeowner in Gardena, California, near Los Angeles, was expecting a delivery, so they left a note inviting the Amazon driver to go for a swim in their backyard pool.
He took 'em up on it. pic.twitter.com/CooMuKwoJz
— Jimi Jamm (@jimijamm) July 24, 2023
advertisement
42 सेकंदांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत असून अनेक कमेंट व्हिडीओवर येत आहेत. व्हिडीओ शेअर करत युजरने लिहिलं की, एक अॅमेझॉन डिलिव्हरी बॉय कोणाच्यातरी पूलमध्ये पोहायला जातो, जेव्हा लॉस एंजेलिसजवळील गार्डना, कॅलिफोर्निया येथील एका घरमालकाला वाटलं की डिलिव्हरी बॉयला सरप्राईज द्यावं. घरमालकानं डिलिव्हरी बॉयसाठी चिठ्ठी सोडली होती. तेव्हा त्यानं घरामागील पूलाजवळ जात आपल्या हातातील सामान खाली ठेवलं आि लगेचच पूलमध्ये उडी घेतली. हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 31, 2023 12:24 PM IST


