VIDEO : मागून येणाऱ्या ट्रेनचा व्हिडिओ बनवत होता तरुण, बसली जबर धडक अन्....

Last Updated:

जगभरात अनेक निरनिराळे लोक आहेत. कोण कधी काय करेल सांगता येत नाही. आजकाल तर तरुणाई सोशल मीडियाच्या आहारी गेली असून दिवसेंदिवस याची क्रेझ वाढत आहे.

मागून येणाऱ्या ट्रेनचा व्हिडिओ बनवत होता तरुण
मागून येणाऱ्या ट्रेनचा व्हिडिओ बनवत होता तरुण
नवी दिल्ली, 31 जुलै : जगभरात अनेक निरनिराळे लोक आहेत. कोण कधी काय करेल सांगता येत नाही. आजकाल तर तरुणाई सोशल मीडियाच्या आहारी गेली असून दिवसेंदिवस याची क्रेझ वाढत आहे. विविध गोष्टींचे फोटो, व्हिडीओ काढत लोक सोशल मीडियावर शेअर करतात. यामध्ये अनेक मजेशीर, धोकादायक, भावुक, विचित्र, स्टंट व्हिडीओ असतात. एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये एक तरुण रेल्वे ट्रॅकवर जाऊन ट्रेनसोबत व्हिडीओ काढत आहे. तेवढ्यात वेगानं ट्रेन येते आणि नको तेच घडतं.
व्हिडीओसाठी एक तरुण रेल्वे ट्रॅकवर उतरला होता. व्हिडीओच्या नादात त्यानं आपला जीवही धोक्यात घातला. मोबाईलमध्ये व्हिडीओ बनवण्यात तरुण इतका गुंग झाला की, ट्रेन त्याला धडक देऊन गेली. हे थरारक दृश्य त्याच्या व्हिडीओमध्ये कैद झालं.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण ट्रेनसमोर उभा राहिला आणि व्हिडिओमध्ये ट्रेन दाखवत होता. व्हिडीओमध्ये तरुण ट्रॅकच्या अगदी शेजारी उभा असल्याचं दिसत आहे. वेगानं ट्रेन येते आणि तरुणाला धडक देऊन निघून जाते. तो बनवत असलेल्या व्हिडीओमध्ये हे दृळ्य कैद झालं असून अंगावर काटा आणणारं थरारक दृश्य आहे.
advertisement
टक्कर इतकी जोरदार होती की त्या तरुणाच्या हातातून मोबाईल निसटला आणि तो स्वतः जखमी होऊन जमिनीवर पडला. आता एवढ्या धडकेत त्याच्या वाचण्याची शक्यता खूपच कमी आहे. हा व्हिडीओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे स्पष्ट झालं नाही. @idiotsInCamera नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 17 सेंकदाचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून लोक अशा स्टंटबाजीवर संताप व्यक्त करत आहेत. लोकांना आपण काय करतोय याचंही भान नसतं.
view comments
मराठी बातम्या/Viral/
VIDEO : मागून येणाऱ्या ट्रेनचा व्हिडिओ बनवत होता तरुण, बसली जबर धडक अन्....
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement