VIDEO : भावाला वाचवण्यासाठी बहिणीनं लावली जीवाची बाजी, मृत्यूच्या दाढेतून वाचवलं
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
पावसामुळे निसर्गरम्य वातावरण झालं असून पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पावसाचा आनंद घेत आहेत. मात्र पावसाळ्यात फिरायला जाणं जेवढं छान वाटतं तेवढंच ते धोकादायकही आहे.
नवी दिल्ली, 31 जुलै : देशभरात सर्वत्र मुसळधार कोसळत आहे. पावसामुळे निसर्गरम्य वातावरण झालं असून पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पावसाचा आनंद घेत आहेत. मात्र पावसाळ्यात फिरायला जाणं जेवढं छान वाटतं तेवढंच ते धोकादायकही आहे. पावसाळ्यात फिरायला गेल्यावर अनेक धक्कादायक घटना घडतात. कधी कोणाचा जीव जातो तर कधी कोण गंभीर जखमी होतो. काही जण तर मृत्यूचा दाढेतून बाहेर येतात. सध्या एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये एका बहिणीनं आपल्या भावाला मृत्यूच्या दारात जाण्यापासून रोखून धरलं. हा व्हिडीओ समोर आल्यापासून जोरदार चर्चेत आहे.
एका बहिणीनं आपल्या भावासाठी आपल्या जीवाची बाजी लावली. त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं. याचा व्हिडीओही समोर आलाय ज्यामध्ये बहिण धबधब्याच्या प्रवाहात भावाला जाण्यापासून रोखते. यासाठी ती आपल्या जीवही धोक्यात घालायला कमी करत नाही.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, डोंगराच्या कुशीतून धबधबा पाहतोय. अनेक पर्यटक निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलेत. मात्र तेवढ्यात एक वाईट घटना घडली. एक लहान मुलगी धबधब्याच्या प्रवाहात वाहून चालला आणि त्याच्या बहिणीनं त्याला धबधब्याच्या प्रवाहात जाण्यापासून रोखलं. बहिणीनं आपल्या भावाला पकडून ठेवलं खाली पडू दिलं नाही. जोपर्यंत कोणी वाचवायला येत नाही तोपर्यंत ती त्याला पकडून होती. हे दृश्य अंगावर काटा आणणारं आहे.
advertisement
पुढे काही लोक येऊन या बहिण आणि भावाला वाचवतात. त्यांना धबधब्याच्या प्रवाहात जाताना वाचवतात. पाण्याचा प्रवाह एवढा वेगानं आहे की सर्वच घाबरले. मात्र बहिणीनं आपल्या भावाला वाचवण्यासाठी अजिबात कसर सोडली नाही. तिनं जिद्दीने त्याला पकडून ठेवलं. हिंमत सोडली नाही.
advertisement
advertisement
दरम्यान, बहिणीचे हे धाडस पाहून सर्वजण सलाम करत आहेत. या घटनेचा व्हिडिओ zindagii.gulzar.ha नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर लोकांच्या लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पहायला मिळत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 31, 2023 8:45 AM IST
मराठी बातम्या/Viral/
VIDEO : भावाला वाचवण्यासाठी बहिणीनं लावली जीवाची बाजी, मृत्यूच्या दाढेतून वाचवलं


