Mira Bhaynder Result 2026 : 'तूला पाडणार...',नरेंद्र मेहतांनी बोलून शिवसेनेचा उमेदवार पाडला, मिरा भाईंदरमध्ये प्रताप सरनाईकांना मोठा झटका
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
भाजपच्या नरेंद्र मेहता यांनी मिरा भाईंदरचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजू भोईर यांना तुला पाडणार असे थेट खुले आव्हान सरनाईक यांना दिले होते. त्यानुसार नरेंद्र मेहता यांनी आपला शब्द खरा करून दाखवत शिवसेनेच्या उमेदवाराला पाडले आहे.
Mira Bhaynder Election Result 2026 : मिरा भाईंदर महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपने सरशी घेतल्याचे चित्र आहे. कारण आतापर्यंत भाजपचे अनेक उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले आहेत. या निवडणुकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना मोठा झटका बसला आहे. कारण भाजपच्या नरेंद्र मेहता यांनी मिरा भाईंदरचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजू भोईर यांना तुला पाडणार असे थेट खुले आव्हान सरनाईक यांना दिले होते. त्यानुसार नरेंद्र मेहता यांनी आपला शब्द खरा करून दाखवत शिवसेनेच्या उमेदवाराला पाडले आहे.त्यामुळे प्रताप सरनाईक यांना मोठा धक्का बसला आहे.
खरं तर मिरा भाईंदरमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात युती होणार होती. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत या युतीसाठी प्रयत्न झाले होते. पण शेवटी ही युती होऊ शकली नाही. त्यामुळे नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वात भाजपने आणि प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वात शिवसेनेने थेट एकमेकांविरूद्ध उमेदवार उभे केले होते. त्यामुळे दोन्ही उमेदवार कडवी झूंज होणार होती.
advertisement
दरम्यान या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने एकमेकांविरूद्ध अनेक आरोप केले होते.तसेच या निवडणुकीत नरेंद्र मेहता यांनी प्रभाग क्रमांक 16 मधील एकनाथ शिंदे यांचे उमेदवार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजू भोईर यांना 'तुला पाडणार' असे आव्हान निर्माण केले होते.खरं तर प्रभाग 16
हा शिवसेनेचा मागच्या 20 वर्षापासूनचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे नरेंद्र मेहता यांच्या खुल्या आव्हानानंतर हा गड राखण्याचे प्रताप सरनाईक यांच्यासमोर मोठे आव्हात होते.
advertisement
पण आता निकालात नरेंद्र मेहता यांनी आपला शब्द खरा करून दाखवत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजू भोईर यांचा पराभव केला आहे, तर भाजप उमेदवार नवीन सिंह यांना जिंकून आणले आहे.त्यामुळे प्रताप सरनाईक यांना मोठा झटका बसला आहे.
प्रभाग क्रमांक 16 मधून भाजपचे उमेदवार
अनिता पाटील
प्रतिभा जाट
वंदना भावसार
नवीन सिंह
advertisement
मिरा भाईंदर महानगरपालिका
एकूण प्रभाग - २४ एकूण जागा - ९५एकूण उमेदवार - ४३५
पक्षनिहाय उमेदवार संख्या
भाजप - ८७ शिवसेना (शिंदे) - ८१राष्ट्रवादी (अजित पवार) - ३३मनसे - ११काँग्रेस - ३२शिवसेना (उद्धव ठाकरे) - ५६राष्ट्रवादी (शरद पवार) - १४वंचित बहुजन आघाडी - ०२बहुजन विकास आघाडी - ०२ (कॅांग्रेस सोबत)रिपाई - ०१ (भाजपासोबत)अपक्ष - ११६
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mira-Bhayandar,Thane,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 4:36 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mira Bhaynder Result 2026 : 'तूला पाडणार...',नरेंद्र मेहतांनी बोलून शिवसेनेचा उमेदवार पाडला, मिरा भाईंदरमध्ये प्रताप सरनाईकांना मोठा झटका









