'हा' आहे देशातील सर्वात श्रीमंत अभिनेता, 12490000000 चा मालक, पत्नीचाही कोट्यवधींचा बिझनेस
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Top 5 India Richest Actors : देशातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांची यादी आता समोर आली आहे. देशातील 'टॉप 5' श्रीमंत अभिनेत्यांमध्ये पहिल्या चार क्रमांकावर बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत.
advertisement
बॉलिवूडपासून साऊथपर्यंतचे अनेक स्टार्स आपल्या चित्रपटांमधून, ब्रँड एंडोर्समेंट्समधून आणि इतर विविध स्रोतांमधून मोठी कमाई करतात व आपला बँक बॅलन्स वाढवत राहतात. पण तुम्हाला माहिती आहे का की देशातील टॉप 5 सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीवर बॉलिवूडचा दबदबा आहे आणि साऊथमधून फक्त एकच स्टार या यादीत सामील होऊ शकला आहे? चला तर जाणून घेऊया भारतातील टॉप 5 सर्वात श्रीमंत अभिनेत्यांची यादी आणि त्यांची नेटवर्थ.
advertisement
शाहरुख खान (Shah Rukh Khan) : शाहरुख खान केवळ भारतातच नव्हे तर जगातील सर्वात श्रीमंत एंटरटेनर्सपैकी एक आहे. त्याची एकूण संपत्ती सुमारे 12,490 कोटी रुपये आहे. तो भारतातील पहिला बिलेनियर अभिनेता ठरला आहे. हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025 नुसार,“बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान 12,490 कोटी रुपयांच्या नेटवर्थसह पहिल्यांदाच अब्जाधीश क्लबमध्ये सामील झाला आहे.” रिपोर्ट्सनुसार, 2025 मधील शाहरुख खान बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेता आहे.
advertisement
advertisement
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) : बॉलिवूडचा शहेनशाह अर्थात अमिताभ बच्चन भारतातील टॉप 5 सर्वात श्रीमंत अभिनेत्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहेत. चित्रपट, ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो आणि विविध ब्रँड एंडोर्समेंट्समधून बिग बी मोठी कमाई करतात. हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025 नुसार त्यांची नेटवर्थ सुमारे 1,630 कोटी रुपये आहे.
advertisement
अक्षय कुमार (Akshay Kumar) : बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार हादेखील देशातील टॉप 5 श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत आहे. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, अक्षय कुमारची अंदाजे नेटवर्थ सुमारे 2,500 कोटी रुपये आहे. तो एका चित्रपटासाठी सुमारे 60 ते 90 कोटी रुपये मानधन घेतो. याशिवाय त्याच्या ‘केप ऑफ गुड फिल्म्स’ या प्रोडक्शन हाऊसमधूनही त्याची चांगली कमाई होते. या बॅनरखाली ‘एरलिफ्ट’, ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ आणि ‘पॅड मॅन’सारख्या हिट चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे.
advertisement
नागार्जुन अक्किनेनी (Nagarjuna Akkineni) : भारताच्या टॉप 5 सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत साऊथ इंडस्ट्रीमधून फक्त नागार्जुन अक्किनेनी यालाच स्थान मिळाले आहे. DNA, द टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, नागार्जुनची अंदाजे नेटवर्थ 3,000 ते 3,500 कोटी रुपये इतकी आहे. तो चित्रपटांव्यतिरिक्त इतर अनेक स्रोतांमधूनही मोठी कमाई करतो.










