VIDEO: बाथरुममध्ये पालींचं मोठं सैन्य, लोक म्हणाले 'हे टॉयलेट आहे की ॲमेझॉनचं जंगल'
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
पावसाळ्यात अनेक किडे, माश्या, अळ्या, मुंग्या घरात शिरतात. या किटकांमुळे अनेक लोक त्रासून जातात. घरातील दिव्याभोवती, लाईटभोवती किडे भिरभिरत राहतात यामुळे घरात पाल, सरडे सहज येतात.
नवी दिल्ली, 30 जुलै: पावसाळ्यात अनेक किडे, माश्या, अळ्या, मुंग्या घरात शिरतात. या किटकांमुळे अनेक लोक त्रासून जातात. घरातील दिव्याभोवती, लाईटभोवती किडे भिरभिरत राहतात यामुळे घरात पाल, सरडे सहज येतात. मात्र कधी घरात पालींची मोठी टोळी एकसोबत फिरताना पाहिली का? एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये पालींची पूर्ण फौजच बाथरुममध्ये पहायला मिळाली. याचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
घरातील बाथरुममध्ये तुम्ही एक दोन पाली कधी पाहिल्या असतील. मात्र कधी पालींची मोठी टोळी रेंगाळताना पाहिलीय का?. नसेल तर हा समोर आलेला व्हिडओ एकदा पहाच. बाथरुममध्ये अक्षरशः पालींचा ढिगारा पहायला मिळतोय. हे पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
advertisement
टॉयलेटच्या वरच्या भिंतीवर किती पाली दिसत आहेत हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. त्यानंतर व्हिडिओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती बाथरूममध्ये कॅमेरा फिरवते आणि सर्वत्र फक्त पाली दिसतात. आता व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीचेही कौतुक करावे लागेल की त्याने एवढी हिंमत दाखवली आणि बाथरूममध्ये घुसून व्हिडीओ रेकॉर्ड केला, नाहीतर लोक एकाच वेळी 2, 4 पाली बघून पळून जातात, पण इथे तर त्यांचं पूर्ण सन्यच आहे. पाहूनच अंगावर काटा येतो.
advertisement
advertisement
@memebook.01 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काही वेळातच व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला. भयानक दृश्य पाहून नेटकरी अनेक कमेंट व्हिडीओवर करत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 30, 2023 3:52 PM IST
मराठी बातम्या/Viral/
VIDEO: बाथरुममध्ये पालींचं मोठं सैन्य, लोक म्हणाले 'हे टॉयलेट आहे की ॲमेझॉनचं जंगल'


