नखांनी वाचवला जीव, मुलीसोबत काय नेमकं घडलं?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
विजेचा झटका बसून जीव गेल्याच्या किंवा जखमी झाल्याच्या अनेक घटना घडतात. अनेकदा निष्काळजीमुळे विजेचा झटका बसतो तर कधी चुकी नसतानाही अनेकजण जखमी होतात.
नवी दिल्ली, 30 जुलै : विजेचा झटका बसून जीव गेल्याच्या किंवा जखमी झाल्याच्या अनेक घटना घडतात. अनेकदा निष्काळजीमुळे विजेचा झटका बसतो तर कधी चुकी नसतानाही अनेकजण जखमी होतात. एक घटना समोर आली आहे, एका विद्यार्थिनिला विजेच्या झटका बसला. मात्र नखांमुळे तरुणीचा जीव वाचला. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.
मुलीला विजेचा झटका बसला. या झटक्यात ती 4 फूट दूर उडाली. मात्र नखांमुळे तिचा जीव वाचल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. हे प्रकरण इंग्लंडमधून समोर आलं आहे. निकोल फोरमन नावाच्या 21 वर्षिय महिलेसोबत हा प्रकार घडल्याचं समोर आलंय.
मुलीनं सांगितलं की, ती बॉयलर नीट करण्याता प्रयत्न करत होती. यादरम्यान तिला अचानक विजेचा झटका बसला. धक्क्यात ती चार पाच मिनिट बेशुद्ध होती. तिला फक्त अंघोळ करायची होती आणि बॉयलर बंद झालं. त्यामुळे ती ते नीट करण्याचा प्रयत्न करत होती. चुकून तिचा हात विखरलेल्या वायरला लागला आणि तिला विजेचा झटका बसला.
advertisement
निकोलला डॉक्टरांकडे नेण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की तिला तिच्या बनावट नखांनी वाचवलं. यामुळे तिचा जीव वाचला. हे ऐकून तिला आश्चर्य वाटलं. अशा अनेक घटना सोशल मीडियावर समोर येत असतात. कधी कशामुळे कोणाचा जीव जाईल आणि जीव वाचेल काही सांगू शकत नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 30, 2023 4:29 PM IST


