Jalgaon Election Result 2026 : जळगावातून पहिला निकाल हाती, भाजपचा डक्का

Last Updated:

जळगाव महापालिकेच्या निवडणुकीचा पहिला निकाल लागला आहे. या निकालात भाजपने बाजी मारली आहे.

jalgaon municipal election result
jalgaon municipal election result
Jalgaon Mumicipal Election Result 2026 : विजय वाघमारे, जळगाव : जळगाव महापालिका निवडणुकीसाठी गुरूवारी 19 प्रभागांमध्ये निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीच्या मतमोजणीला काही तासांपूर्वीच सुरूवात झाली असून जळगाव महापालिकेच्या निवडणुकीचा पहिला निकाल लागला आहे. या निकालात भाजपने बाजी मारली आहे. प्रभाग क्रमांक 19 मधून भाजपचे राजेंद्र घुगे पाटील विजयी ठरले आहे. त्यामुळे जळगावमध्ये पहिले कमळ फुलले आहे.
खान्देशातील सर्वात मोठी आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाणारी जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण १९ प्रभागांमध्ये मतदान घेण्यात आले होते. या मतदानानंतर आता मतमोजणी पार पडते आहे.
12 उमेदवार बिनविरोध विजयी
जळगाव महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे एकूण १२ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. यामध्ये भाजपचे ६ आणि शिंदेसेनेचे ६ उमेदवार आहेत. गुरुवारी (१ जानेवारी) भाजपचा एक आणि शिंदेसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आणखी उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने या संख्येत वाढ झाली.
advertisement
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार
भाजपकडून उज्ज्वला बेंडाळे, दीपमाला काळे, विशाल भोळे, विरेन खडके, अंकिता पंकज पाटील आणि वैशाली अमित पाटील हे सहा उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.तर शिवसेना (शिंदे गट) कडून गौरव सोनवणे, सागर सोनवणे, गणेश सोनवणे, रेखा पाटील, मनोज चौधरी आणि प्रतिभा देशमुख हे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
advertisement
पुढील राजकीय समीकरणांकडे लक्ष
या बिनविरोध विजयांमुळे महायुतीला निवडणुकीपूर्वीच मोठे बळ मिळाले आहे. मात्र उर्वरित प्रभागांमध्ये होणाऱ्या थेट लढतींमुळे निवडणुकीचे अंतिम चित्र काय असेल, याबाबत उत्सुकता कायम आहे. जळगाव महानगरपालिकेतील सत्ता कोणाच्या हाती जाणार, महायुती आपले वर्चस्व कायम ठेवणार की विरोधक धक्का देणार, याकडे आता संपूर्ण खान्देशाचे लक्ष लागले आहे.
महायुतीची जागावाटपाची रणनीती
जळगावमध्ये महायुतीची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. या अंतर्गत भाजपला ४६ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना ६ जागा, तर शिवसेना (शिंदे गट) यांना २३ जागा देण्यात आल्या आहेत. मात्र या जागावाटपात काही प्रभागांमध्ये भाजप आणि शिंदेसेना यांच्यात उमेदवारांची आयात-निर्यात झाल्याचे चित्र दिसून आले. यामुळे काही ठिकाणी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे सूर उमटले असून, ती दूर करण्यासाठी पक्षनेतृत्वाकडून समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaon Election Result 2026 : जळगावातून पहिला निकाल हाती, भाजपचा डक्का
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement