Badlapur News : बदलापूरचा कायापालट! बीकेसी धर्तीवर बिझनेस हब; काय आहे सरकारचा मास्टर प्लॅन?

Last Updated:

Badlapur Development : बदलापूर शहराच्या विकासासाठी या शहरात बीकेसीच्या धर्तीवर कात्रप सिटी उभारण्याची संकल्पना मांडली असून या प्रकल्पातून नागरिकांना परवडणाऱ्या दरात आधुनिक सुविधा मिळणार आहेत.

News18
News18
बदलापूर : बदलापूर शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबईतील बीकेसीच्या धर्तीवर बदलापूरमध्ये बदलापूर कात्रप सिटी अर्थात स्वतःचे बीकेसी उभारण्याचा त्यांचा मानस आहे. मुंबई उपनगरातून बदलापूरकडे स्थलांतर करणाऱ्या नागरिकांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यांना मुंबईसारख्या सुविधा परवडणाऱ्या दरात मिळाव्यात हा या संकल्पनेमागील मुख्य हेतू आहे.
बदलापुरात 'बीकेसी' येणार
या प्रकल्पाअंतर्गत मोठ्या आणि सुसज्ज गृहसंकुलांची उभारणी केली जाणार आहे. यासोबतच नागरिकांसाठी माफक दरात दर्जेदार आरोग्यसेवा देणारी रुग्णालये, परवडणाऱ्या शुल्कातील चांगल्या शाळा, बाजारपेठा तसेच दैनंदिन गरजांसाठी आवश्यक सर्व सुविधा एकाच परिसरात उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन गरजांसाठी शहराबाहेर जावे लागणार नाही.
या संकल्पनेची सविस्तर माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत अजय ठाणेकर यांनी सांगितले की बदलापूरमधील इतर बांधकाम व्यावसायिकांनीही पुढाकार घेतला तर शहराचा चेहरामोहरा बदलू शकतो. सर्वांनी विकासाचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून एकत्र काम केल्यास बदलापूरचा विकास मुंबईच्या धर्तीवर होऊ शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
advertisement
पुढील पाच वर्षांत ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि स्थापत्य क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून नियोजनबद्ध पद्धतीने काम केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईप्रमाणेच बदलापूर शहराचा अभिमान नागरिकांना वाटावा हाच या उपक्रमामागील प्रामाणिक उद्देश असल्याचे ठाणेकर यांनी सांगितले. या अभिनव संकल्पनेचे शहरात सर्वत्र स्वागत होत असून बदलापूरच्या विकासाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Badlapur News : बदलापूरचा कायापालट! बीकेसी धर्तीवर बिझनेस हब; काय आहे सरकारचा मास्टर प्लॅन?
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement