विमान म्हणजे त्यात प्रवाशांना बसण्यासाठी असलेली सीट्सची जागा, कॉकपिट आणि टॉयलेट बस्सं इतकंच असतं असं आपल्याला वाटतं. पण विमानात एक सीक्रेट रूमही असते. जी आपल्याला सहसा दिसत नाही. हा भाग नेहमी प्रवाशांच्या नजरेपासून दूर ठेवला जातो. प्रवाशांना या भागात प्रवेश दिला जात नाही, किंबहुना तिथं प्रवासी जाऊच शकत नाहीत. या सिक्रेट रूममध्ये एंट्रीसाठी एक सिक्रेट कोड आहे, फक्त क्रू मेंबर्सद्वारे वापरला जातो. कारण तो पूर्णपणे क्रूसाठी राखीव असतो.
advertisement
Plane Facts : प्लेनच्या टॉयलेटमध्ये असतो 'खजिना', त्याचं आहे सीक्रेट बटण, कुठे असतं?
विशेषतः लांबच्या आंतरराष्ट्रीय फ्लाइट्समध्ये ही रूम असते, ही खोली केबिन क्रू आणि पायलटसाठी विश्रांतीची जागा आहे. याचा उपयोग फक्त क्रू मेंबर्स म्हणजे एअर होस्टेस आणि पायलट्स विश्रांती घेण्यासाठी करतात. लांबच्या फ्लाइट्समध्ये क्रू शिफ्टमध्ये काम करतो. काही लोक विश्रांती घेतात, तर इतर प्रवाशांची सेवा करतात. त्यामुळे त्यांना कामाचं योग्य व्यवस्थापन करता येतं आणि प्रवाशांनाही चांगली सेवा मिळते. या सीक्रेट रूमला क्रू रेस्ट एरिया म्हणतात. हा रेस्ट एरिया फक्त लांब पल्ल्याच्या फ्लाइट्समध्ये असतो. छोट्या आणि कमी वेळाच्या फ्लाइट्समध्ये ही सोय नसते, कारण त्यामध्ये विश्रांतीची गरज कमी असते.
या रूममध्ये काय काय असतं?
या गुप्त खोलीत सुमारे 10 बेड आहेत. प्रत्येक केबिन पडद्याच्या मदतीने वेगळ्या केल्या आहेत. या बंक्समध्ये रीडिंग लाइट्स, बॅगसाठी हुक, आरसे आणि हँड लगेजसाठी स्टोरेजदेखील आहे. त्यात एक ब्लँकेट आणि उशीदेखील असते. छोटे बेड, काही ठिकाणी टीव्ही आणि काही विमानांमध्ये टॉयलेटही असतं.
Hidden room on airplane allows flight staff to have a restadvertisement
ही रूम कुठे असते?
विमानांमध्ये एक सिक्रेट जिना असतो, जो खिडक्या नसलेल्या केबिनकडे नेतो. त्येक विमानाला जिना नसतो पण प्रत्येक विमानाला एक गुप्त खोली असते. ही विमानाची सिक्रेट रूम कॉकपिटजवळ किंवा काही विमानांमध्ये वरच्या भागात असते. त्याचे दरवाजे सामान्य दरवाजासारखे दिसतात. r/BeAmazed रेडिट अकाऊंटवर या सीक्रेट रूमचा व्हिडीओही पोस्ट करण्यात आला आहे.