TRENDING:

बोंबला! प्रायव्हेट पार्टचा आकार वाढवायला गेला पुरुष, सर्जरीदरम्यान डॉक्टरांकडून मोठी चूक

Last Updated:

Private Surgery : ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे तो केवळ सामान्य शारीरिक कार्यांपासून वंचित राहिला नाही तर मानसिक ताणतणावाचाही बळी ठरला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : आता शरीराचा किंवा अवयवांचा आकार लहानमोठा करण्यासाठी सर्जरी केल्या जातात. असाच एक पुरुष जो आपल्या प्रायव्हेट पार्टचा आकार मोठा करण्यासाठी गेला. पण डॉक्टरांकडून मोठी चूक झाली आणि या पुरुषाच्या मर्दांगीलाच धक्का बसला आहे. डॉक्टरांनी पुरुषाच्या प्रायव्हेट पार्टमधील महत्त्वाचा भाग कापला आहे.
News18
News18
advertisement

दक्षिण कोरियाच्या सोल शहरातील हे प्रकरण आहे. 2020 सालची ही घटना. गंगनम जिल्ह्यातील एका खाजगी रुग्णालयात एका 35 वर्षांच्या पुरुषाच्या प्रायव्हेट पार्टचा आकार वाढवण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. पण ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे तो केवळ सामान्य शारीरिक कार्यांपासून वंचित राहिला नाही तर मानसिक ताणतणावाचाही बळी ठरला.

advertisement

अहवालानुसार ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांनी अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या ऊती कापल्या. यामध्ये कॉर्पस कॅव्हर्नोसम नावाच्या ऊती समाविष्ट होत्या, ज्या इरेक्शनच्या महत्त्वाच्या होत्या. याशिवाय मूत्रमार्गाभोवती असलेल्या कॉर्पस स्पंजिओसमला देखील नुकसान झालं. या दुहेरी दुखापतीमुळे रुग्णाच्या शरीराचा काही भाग गंभीरपणे खराब झाला.

होबोसेक्शुअलिटी डेटिंगची नवी पद्धत; काय आहे का नवा प्रकार, कसं असतं, यात होतं काय?

advertisement

तज्ज्ञांनी सांगितलं की जेव्हा ऊतींना गंभीर चिकटपणा आला असता तेव्हा शस्त्रक्रिया थांबवायला हवी होती आणि टाके टाकून समस्या सोडवायला हवी होती, पण तरी पुढे जाणं ही एक गंभीर चूक असल्याचं सिद्ध झालं. रुग्णाच्या शरीरात आधीच एक इम्प्लांट होतं जे त्याच्या ऊतींमध्ये मिसळलं होतं. या परिस्थितीत कोणतीही नवीन शस्त्रक्रिया अधिक धोकादायक होती. म्हणूनच, तज्ज्ञांचं मत आहे की डॉक्टरांनी अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे होती. चुकीच्या शस्त्रक्रियेचा परिणाम केवळ शारीरिकच नाही तर मानसिकदेखील झाला. रुग्णाला सामान्य जीवनात आणि दैनंदिन कामांमध्ये अडचणी येत आहेत. लघवी करणे आणि आत्मसन्मान कमी होणे यासारख्या मूलभूत कामांमध्ये अडचण येणं यामुळे तो मानसिक ताणतणावातही ढकलला गेला.

advertisement

हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं आणि जानेवारी 2024 मध्ये सोलच्या एका न्यायालयाने डॉक्टरला सुमारे 13100 पाऊंड म्हणजे सुमारे 13 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले. डॉक्टरने या निर्णयाला आव्हान दिलं पण त्याची याचिका फेटाळण्यात आली. याचिका फेटाळल्यानंतर न्यायालयाने ऑगस्ट 2025 मध्ये त्याला अतिरिक्त 3000 पाऊंड म्हणजे सुमारे 3 लाख रुपये भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले.

advertisement

एक वर्षाने लहान नवरा, बायकोला स्पर्श केला नाही, 6 महिने संबंधच ठेवले नाही, नात्याचा शेवट मृत्यू

सुनावणीदरम्यान असा आरोपही समोर आला की डॉक्टरने रुग्णाला संभाव्य धोके आणि जोखीम याबद्दल आगाऊ माहिती दिली नव्हती. जर जोखमींबद्दल संपूर्ण माहिती दिली असती, तर रुग्ण शस्त्रक्रियेसाठी सहमत झाला नसता.  जर डॉक्टरांनी वेळीच चेतावणी देणारी चिन्हे ओळखली असती तर ऑपरेशन दरम्यान दुखापत टाळता आली असती, असंही निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं.

मराठी बातम्या/Viral/
बोंबला! प्रायव्हेट पार्टचा आकार वाढवायला गेला पुरुष, सर्जरीदरम्यान डॉक्टरांकडून मोठी चूक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल