खड्ड्यात पडलेल्या कुत्र्याच्या रेस्क्यूचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता रस्त्यावर एक छोटासा खड्डा आहे, ज्यात पाईप टाकला आहे. हा खड्डा इतका लहान आहे की त्यात एक हात जाणंही मुश्किल. पण या खड्ड्यात पडला आहे तो एक कुत्रा, कुत्र्याचं छोटं पिल्लू. ज्याला वाचवण्यासाठी पोलिसांची धडपड सुरू आहे.
advertisement
गणपती बाप्पा वाटला, हत्तीला पाहताच चिमुकलीने केला नमस्कार; पुढे घडलं ते थक्क करणारं
एवढ्याशा खड्ड्यातून कुत्र्याला बाहेर काढायचं तरी कसं? असा प्रश्न. आपण पाहिलं तर हे शक्यच नाही असं वाटतं. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सुरुवातीला एक पोलीस अगदी रस्त्यावर बसला आहे, त्याच्या हातात कोयता आहे आणि त्याने तो त्या खड्ड्यातील पाइप कापतो. त्यात एक हुक असलेली सळी टाकली जाते. पण त्यानेही काही कुत्रा बाहेर काढता येत नाही.
शेवटी मग एक पातळ असा पाइप घेतला जातो ज्यात एक दोरी टाकली जाते. हा पाइप मग त्या खड्ड्यात सोडला जातो. मोबाईल टॉर्चने खड्ड्यात प्रकाश सोडला जातो.
मग दोरी त्या कुत्र्याच्या गळ्यात टाकून त्याला हळुवारपणे वर खेचलं जातं. बऱ्याच तासांच्या प्रयत्नानंतर सुखरूपरित्या त्याला बाहेर काढलं जातं. पिल्लाची आई तिथंच होती. आपलं पिल्लू कधी बाहेर काढत आहेत, याचीच ती वाट पाहत होती. जसं पिल्लू बाहेर येतं तसं ती त्याला चाटते, त्याला कुठे लागलं तर नाही ना हे तपासते.
Cobra Vs Python Vs Anaconda : कोब्रा, अजगर की अॅनाकोंडा; कोण सगळ्यात खतरनाक?
thebetterindia.hindi इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार ही घटना तामिळनाडूतील आहे.
