व्हिडिओमध्ये दिसतं की रस्त्याच्या मध्यभागी दोन उंदीर जोरदार भांडण करतायत. इतकंच नाही, तर बाजूने वाहनेही जातायत पण हे दोघं चक्क रस्त्यावरच झुंजतायत. त्यांना थांबवण्यासाठी एक व्यक्ती येतो आणि त्यांना रागावतो. तो हात उगारून त्यांना घाबरवतो आणि शेवटी ते उंदीर शांत होतात. हे दृश्य पाहताना खरोखरंच आश्चर्यचकीत करणारं आहे. उंदरांना असं भांडताना पाहाणं हे विश्वास न बसण्यासारखंच आहे.
advertisement
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर raja_pehlwan_ नावाच्या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 12 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत आणि जवळपास साडेनऊ लाखांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिलं, "कोणी तरी पोलीस स्टेशनला कॉल करा." दुसऱ्याने मजेत लिहिलं, "साइडला भांडत बसा." तिसऱ्याने कमेंट केली, "हे प्रकरण जरा सिरियस वाटतंय." तर कुणी तर अंदाज बांधला की, "हे नक्की नवरा-बायको असतील, महाभारत सुरू आहे." आणखी एका यूजरने लिहिलं, "अशा लोकांवर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे, जे खुलेआम कायदा हातात घेतायत."