याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी औषधांचे डिस्ट्रीब्युटरशी संवाद साधला. त्यांनी औषधांच्या वेगवेगळ्या प्रकारांनुसार मिळणाऱ्या नफ्याचं सविस्तर गणित समजावून सांगितलं.
1. फार्मा औषधं
फार्मा कॅटेगरीतील औषधांवर साधारण 20 ते 30% नफा असतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिल्या जाणाऱ्या या औषधांमध्ये नेहमीच किमान 20% नफा मिळतो, तर कधी कधी तो 35% पर्यंत जातो.
2. जेनेरिक औषधं
advertisement
या औषधांवर सर्वाधिक नफा मिळतो. जेनेरिक औषधं अनेकदा दुकानदार स्वतःहून ग्राहकाला विकतो. यात 50% ते 75% पर्यंत नफा मिळतो.
3. मोनोपोलाइज्ड कंपन्यांची औषधं
या प्रकारात काही कंपन्या डॉक्टरांना आपल्या औषधांचा सल्ला द्यायला सांगतात. यात डॉक्टरांना देखील कमिशन असू शकतं. अशा औषधांवर 30 ते 35% नफा असतो.
गुणवत्ता आणि खर्च
औषध डिस्ट्रीब्युटर करणारे सांगतात की काही औषधं तयार करताना 90% पर्यंतच मटेरियल वापरलं जातं. नियमांनुसार औषधात मटेरियल 90% पेक्षा कमी किंवा 110% पेक्षा जास्त असू नये. त्यामुळे काही कंपन्या किमान प्रमाण वापरून जास्त नफा कमावतात. मोठ्या कंपन्या मात्र योग्य प्रमाण वापरतात, त्यामुळे त्यांच्या औषधांची किंमत थोडी जास्त असते.
उदाहरणार्थ, एखादं औषध जर 100 रुपयांचं असेल तर मोठी कंपनी ते 65 रुपयांत तयार करते. पण तेच जेनेरिक औषध फक्त 25 रुपयांत तयार होतं.
खोकल्याच्या सिरपवर किती नफा?
जेनेरिक खोकल्याचं औषध फक्त 8 रुपयांत तयार होतं. ते दुकानदाराला 20 ते 30 रुपयांत मिळतं. पण त्याची MRP 80 ते 100 रुपये लावली जाते. त्यामुळे या औषधात दुकानदाराला चांगलाच नफा मिळतो.