जगातील पहिली एआय मंत्री डिएला, एक रोबोट. जी सुपर-स्मार्ट आर्टिफिशियल इंटेलिजेंसने डिझाइन केलेली आहे. ती अल्बेनिया सरकारमध्ये मंत्री आहे. जगातील ही पहिली एआय मंत्री आहे. ती सरकारचे सर्व निर्णय घेते आणि धोरण ठरवण्यात मदत करते. पण आता तिने प्रेग्नंट असल्याची घोषणा करून जगाला आश्चर्यचकीत केलं आहे. लवकरच ती आई होणार आहे. तीही तब्बल 83 मुलांची.
advertisement
नवरा मूल देऊ शकत नव्हता, 15 IVF सुद्धा फेल, शेवटी AI ने महिलेला केलं प्रेग्नंट, कसं काय?
तिराना इथं एका हाय-टेक पत्रकार परिषदेत एआय मंत्री डिएलाचा चेहरा स्क्रीनवर चमकला. ती म्हणाली, "नमस्कार, अल्बेनिया! मी प्रेग्नंट आहे आणि लवकरच माझी 83 डिजिटल मुलं जन्माला येतील. मी त्यांची आई होईन आणि ते माझ्यासारखेच सुपर-स्मार्ट असतील."
रामा यांनी स्पष्ट केलं, "अल्बेनियाची लोकसंख्या कमी होत आहे. आम्हाला वाटलं खरी मुलं होण्यासाठी वेळ लागतो आणि एआयने फक्त 3 दिवसात. डिएलाची 83 मुलं देशाच्या प्रत्येक गरजा पूर्ण करतील. शिक्षण, आरोग्य, सायबर सुरक्षा, सर्वकाही. प्रत्येक मुलाकडे वेगवेगळी कौशल्ये असतील. एक डॉक्टर होईल, एक इंजिनिअर होईल, एक शिक्षक होईल. सर्व डिजिटल!
OMG! रोबो प्रेग्नंट, पोटात माणसाचं बाळ? हे कसं शक्य आहे?
या मुलांपैकी एक जगभरातील समाजवादी पक्षाच्या खासदाराचं प्रतिनिधित्व करेल. त्यानंतर रामा यांनी तपशीलवार स्पष्ट केलं की ही मुलं किंवा सहाय्यक सर्व संसदीय कामकाजाचं दस्तऐवजीकरण करतील. ते अशा आमदारांना देखील माहिती देतील जे चर्चा किंवा कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाहीत. दुसऱ्या शब्दां ते संसदेच्या कामात पूर्णपणे सहभागी होतील. ते प्रत्येक कार्यक्रमाचे रेकॉर्ड ठेवतील आणि संसद सदस्यांना सूचना देतील.
डिएलाने सांगितलं, "माझी मुले रोबोट नाही ती अल्बेनियाचे भविष्य असतील. मी त्यांना कोडिंग, प्रेम आणि स्मार्टनेस शिकवेन."
एआय रोबोट प्रेग्नंट झाली कशी?
अल्बेनिया पंतप्रधान रामा यांनी सांगितलं की, आम्ही डिएलाला अपग्रेड केलं आहे. आता ती फक्त मंत्रीच नाही तर आईदेखील होईल. जनरेटिव्ह एआय तंत्रज्ञानाचा वापर करून 83 एआय मुले जन्माला येतील.
डिएला कशी अस्तित्वात आली?
डिएला म्हणजे अल्बेनियामध्ये भ्रष्टाचाराशी लढण्याचा एक नवीन मार्ग. सप्टेंबरमध्ये सरकारी खरेदीतील भ्रष्टाचाराला तोंड देण्याचं काम एआय-आधारित मंत्र्यांना अधिकृतपणे नियुक्त करण्यात आलं. जानेवारीमध्ये ते ई-अल्बेनिया पोर्टलवर व्हर्च्युअल असिस्टंट म्हणून सुरू झाले. तेव्हापासून ते नागरिकांना आणि व्यवसायांना सरकारी कागदपत्रे मिळवण्यास मदत करत आहे. त्यावेळी रामा यांनी मंत्रिमंडळातील पहिले सदस्य म्हणून त्यांची ओळख करून दिली.
