OMG! रोबो प्रेग्नंट, पोटात माणसाचं बाळ? हे कसं शक्य आहे?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Pregnant robot human baby : एका कंपनीने दावा केला आहे की ते जगातील पहिला प्रेग्नन्सी रोबोट बनवत आहे. हा रोबोट माणसाप्रमाणेच मुलाला जन्म देऊ शकेल.
नवी दिल्ली : सध्या टेक्नॉलॉजी, एआयचा जमाना आहे. त्यामुळे आयव्हीएफ, टेस्ट ट्युब बेबी अशा पद्धतीनेही मूल जन्माला घालण्याचं तंत्र उपलब्ध झालं आहे. आता लवकरच एक रोबोटही माणसाच्या बाळाला जन्म देऊ शकणार आहे. एका कंपनीने जगातील पहिला प्रेग्नन्सी रोबोट बनवत असल्याचा दावा केला आहे.
रोबोट ज्यामुळे माणसांची अनेक कामं हलकी आणि सोपी झाली आहेत. कितीतरी ठिकाणी मानवी कामांसाठी रोबोटचा वापर केला जातो. पण प्रेग्नन्सीमध्येही रोबोट कामी येऊ शकतात याचा तुम्ही कधी विचार तरी केला होता का? एक रोबोट तो प्रेग्नंट होणार आणि मानवी बाळाला जन्म देणार हे कसं शक्य आहे, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
advertisement
चिनी रोबोटिक्स कंपनी कैवा टेक्नॉलॉजीने दावा केला आहे की ते जगातील पहिला प्रेग्नन्सी रोबोट बनवत आहे. हा रोबोट माणसाप्रमाणेच मुलाला जन्म देऊ शकेल. सिंगापूरमधील नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ डॉ. झांग किफेंग यांच्या नेतृत्वाखाली हा रोबोट विकसित केला जात आहे.
advertisement
तज्ज्ञांंनी असा दावा केला आहे की हे तंत्रज्ञान गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत गर्भधारणेचं अनुकरण करेल. हा प्रेग्नेंसी रोबोट 10 महिन्यांची गर्भधारणा पूर्ण करेल. या रोबोटच्या पोटात एक कृत्रिम गर्भाशय असेल, ज्याला ट्युबद्वारे पोषण दिलं जाईल. पण अंडी आणि शुक्राणूंचं नेमकं कसं फलन केलं जाईल याची माहिती शास्त्रज्ञांनी दिलेली नाही. त्यानंतर तो खऱ्या मुलालाही जन्म देईल.
advertisement
हा रोबोट पुढील वर्षी लाँच केला जाईल. त्याची किंमत 1 लाख युआन म्हणजे सुमारे 11.6 लाख रुपये असेल, असं सांगितलं जातं आहे. जर हे तंत्रज्ञान यशस्वी झालं तर वंध्य जोडप्यांना किंवा जैविक गर्भधारणा न करण्यास प्राधान्य देणाऱ्या व्यक्तींना मदत मिळेल. पण काही चिनी तज्ज्ञांनी असा दावा केला की यामुळे बाळ आणि आईमधील नैसर्गिक संबंध संपुष्टात येईल. तथापि अनेक वैद्यकीय तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की रोबोटना मानवांप्रमाणे पुन्हा गर्भधारणा करणे जवळजवळ अशक्य आहे.
view commentsLocation :
Delhi
First Published :
August 18, 2025 2:08 PM IST


