सोशल मीडियावरील या व्हायरल व्हिडीओमध्ये कपल रात्रीच्या अंधारात कायाकिंग करत असताना दिसत आहे. ते एका रोमँटिक डेटचा आनंद घेत आहेत. पाण्याच्या मधोमधू आजाबाजूला कोणी नाही आणि सोबतीला घनदाट काळोख असा वेळ घालवण्यासाठी हे कपल पाण्यात कायाकिंग करत असतात. पण त्यांच्यासोबत धक्कादायक प्रसंग घडतो, हे कपल न कळत मृत्यूच्या तोंडात येऊ थांबतात.
advertisement
आता असं ऐकल्यानंतर नक्कीच तुमच्या अंगावर काटा उभा राहिल आणि नक्की असं काय घडलं? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल? चला या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
व्हिडिओमध्ये दिसतं की कपल पाण्यात शांतपणे कयाक चालवत आहे. चारही बाजूला शांतता, लाटांचा हलका आवाज, एकदम परफेक्ट रोमँटिक वातावरण. पण अचानक मुलीचा चेहरा गंभीर होतो. काही सेकंदांतच कॅमेऱ्यात दिसतं की मोठी मगर त्यांच्या बोटीजवळून अगदी शांतपणे पुढे येत असते. मग पाहून कपलच्या चेहऱ्याचा रंगच उडतो आणि ही आपली शेवटची रात्र आहे असा विचार त्या कपलच्या मनात येतो. पण सुदैवाने ती मगर त्यांना काही करत नाही आणि पुढे निघून जाते.
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर Vishvendra Meena नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला असून आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे, हजारोंनी लाईक केला आहे. युजर्सच्या भन्नाट कमेंट्समुळे व्हिडिओ आणखी मजेदार झाला आहे. एका युजरने लिहिलं, "हात आत ठेवा, ही राइड धोकादायक होऊ शकते." तर दुसऱ्याने जोक केला, "मगरमच्छ म्हणाला शांत बसा, आज भूक नाहीये, डेट एन्जॉय करा."
तिसऱ्या युजरने लिहिलं, "सगळ्यात आश्चर्य म्हणजे मुलगी एकदाही किंचाळली नाही, बहुतेक भीतीने आवाजच गेला असेल." तर काहींनी मजेत लिहिलं, "AI आता इतका रिअल वाटतोय की घाबरायला होतंय."