TRENDING:

मीठ टाकून चहा प्यायल्याने काय होतं? डॉक्टरने करून पाहिलं आणि आश्चर्यचकीत करणारा परिणाम

Last Updated:

एका अमेरिकन केमिस्टने चहा चविष्ट बनवण्यासाठी काही खास टिप्स दिल्या आहेत. यातील एका टिप्समध्ये त्यांनी मीठ वापरण्याचा सल्लाही दिला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : हिवाळ्यातील थंडी आणि गरमागरम चहा हे जणू समीकरणच... चहाची चव खास असेल तर मजा काही औरच... चहाची चव वाढवण्यासाठी लोक काय काय नाही करत.. कुणी वेलची टाकतं, कुणी आलं टाकतं, कुणी चहाचा मसाला टाकतं. पण एका एका व्यक्तीने चहामध्ये मीठही टाकून पाहिलं आणि त्याचा परिणाम आश्चर्यचकीत करणारा आहे.
प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
advertisement

चहा कोणताही असो त्यात तीन गोष्टी कॉमन असतात ते म्हणजे पाणी, साखर आणि चहापावडर. पण तुम्ही कधी चहामध्ये मीठ टाकून पाहिलं आहे का? मीठ अन्नपदार्थांची चव वाढवतं. पण तरी आपण चहामध्ये कधी चवीसाठी मीठ टाकत नाही. चहात मीठ टाकल्याने खरंच चहाचीसुद्धा चव वाढते का? हे पाहण्यासाठी अमेरिकेतील एका केमिस्टनं हा प्रयोग करून पाहिला. डॉ. मिशेल फ्रँकी असं त्यांचं नाव.

advertisement

अजबच आहे राव! पाणीपुरी खाण्यासाठी दाखवावं लागणार आधार कार्ड

अमेरिकन केमिस्ट डॉ मिशेल फ्रँकी यांनी हा चविष्ट बनवण्यासाठी काही खास टिप्स दिल्या आहेत. त्यांनी चहा बनवण्यापूर्वी कप गरम करण्याचा सल्ला दिला. कप गरम ठेवल्याने चहातील अँटिऑक्सिडंट्स आणि कॅफिनचा प्रभाव वाढेल आणि चहाला चव चांगली येईल, असा त्यांचा दावा आहे. यासाठी प्रथम चहाच्या कपमध्ये गरम पाणी घाला आणि काही मिनिटे सोडा आणि नंतर तुम्ही तो कप रिकामा करू शकता.

advertisement

चहा बनवताना चहाच्या आधी किंवा नंतर कपमध्ये थंड दूध टाकावं का, हा प्रश्न लोक अनेकदा विचारतात. पण डॉ. फ्रँकीजच्या क्लासिक ब्रिटिश कूपा चहाची ही रेसिपी त्याहून अधिक सांगते. ती सांगते की, गरम दूध उकळल्यानंतरच चहामध्ये घालावं. पण ते टाकल्याबरोबर चमच्याने पटकन चहामध्ये मिसळलं पाहिजे.

यानंतर डॉ. फ्रँकी यांनी दिलेला अजब सल्ला. त्यांनी चहात थोडं मीठ घालायला सांगितलं. अनेकांना वाटते की साखर चहामध्ये कडूपणा कमी करते, परंतु वास्तविकता अशी आहे की या प्रकरणात मीठ अधिक प्रभावी आहे. फ्रँकी यांच्या मते, चिमूटभर मीठ टाकल्याने चहाची चव सुधारते.

advertisement

डॉ. फ्रँकी सांगतात की, असं आढळून आलं, मिठामुळे चहामध्ये फारसा फरक पडत नाही, पण त्यामुळे अनेक प्रकारच्या चहाची चवही बिघडते. याशिवाय थोडं मीठही अनेकांना आवडू शकत नाही. तर अनेकांना काही फरक पडत नाही. पण फ्रूट टीची चव मिठानं चांगली बनते.

OMG! महिलेच्या बागेत झाडाला लागला असा विचित्र लिंबू; कापताच आत जे दिसलं ते पाहून सर्व घाबरले

advertisement

मग तुम्हाला तुमच्या चहामध्ये थोडे मीठ वापरून बघायला आवडेल का? तुम्ही चहात मीठ टाकून प्यायल्यात का? तुम्हाला हा चहा कसा वाटला? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या/Viral/
मीठ टाकून चहा प्यायल्याने काय होतं? डॉक्टरने करून पाहिलं आणि आश्चर्यचकीत करणारा परिणाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल