अमेरिकेतील विस्कॉन्सिनमध्ये ग्रीन बे नावाचं एक शहर आहे. येथील सेंट व्हिन्सेंट रुग्णालयात एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. रुग्णालयाच्या प्रसूती आणि स्त्रीरोग विभागात काम करणाऱ्या 14 परिचारिका एकाच वेळी गर्भवती राहिल्या. जेव्हा ही बातमी समोर आली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.
अमेरिकेत 6 मे ते 12 मे नॅशनल नर्स वीक सुरू असताना मदर्स डेच्या निमित्ताने मेडिकल सेंटरने ही खास बातमी दिली. रुग्णालयाने स्वतः एक प्रेस रिलीज जारी करून याची माहिती दिली. पीपल वेबसाइटच्या अहवालानुसार, रुग्णालयाच्या संचालकांनी सांगितले की, रुग्णालयातील काही परिचारिका पहिल्यांदाच आई होणार आहेत. या सर्व महिला आधीच बाळाची काळजी घेण्यात तज्ज्ञ झाल्या आहेत. आता त्यांचं या क्षेत्रातील ज्ञान वाढेल.
advertisement
त्याच रुग्णालयात परिचारिकांची आरोग्य तपासणी देखील सतत केली जात असल्याचं प्रेस रिलीजमध्ये सांगण्यात आले. अनेक परिचारिकांची प्रसूती वेगवेगळ्या महिन्यांत होते.
या बातमीची माहिती मेल स्पेसेस या इन्स्टाग्राम अकाउंटवरही देण्यात आली. एकाच रुग्णालयातील 14 परिचारिका एकाच वेळी गर्भवती असल्याचं जाणून लोकांना खूप आश्चर्य वाटलं. एका व्यक्तीने कमेंट करत म्हटलं. जर त्या सर्वांनी एकत्र प्रसूती रजा घेतली तर रुग्णालयाची काळजी कोण घेईल? एकाने सांगितले की आता रुग्णालयात मोठ्या प्रमाणात भरती होतील. एकाने सांगितले की रुग्णालयात आता सुमारे आठ महिने कर्मचाऱ्यांची कमतरता असेल.