नेमकं काय दिसलं व्हिडिओमध्ये?
व्हायरल व्हिडिओमध्ये एक सीगल (समुद्री पक्षी) सशाच्या बिळाजवळ उभा असल्याचं दिसतं. काही वेळातच तो सशाला बिळातून बाहेर खेचतो आणि आपल्या चोचीने त्याचं डोकं पकडतो. पाहता पाहता तो ससा जिवंतपणीच गिळून टाकतो.
सामान्यतः हे समुद्री पक्षी मासे, किडे, लहान खेकडे आणि शिंपले खातात. याशिवाय लहान पक्षी आणि त्यांची अंडी हेही त्यांच्या आहाराचा भाग असतात. मात्र, जिवंत ससा गिळल्याचं हे दृश्य आश्चर्यकारक आहे. अनेक नेटिझन्सचं मत आहे की कदाचित हा सीगल फार भुकेला असावा, म्हणूनच त्यानं इतक्या मोठ्या शिकाराचा फडशा पाडला.
advertisement
व्हिडीओ शेअर करणाऱ्याचं म्हणणं
हा व्हिडीओ इन्स्टाग्राम पेज @detailedexplanation वरून शेअर करण्यात आला आहे. त्यासोबत यूजरनं सांगितलं की सीगल हे संधीसाधू शिकारी असतात. ते आपल्या आसपासच्या वातावरणाशी जुळवून घेत कोणत्याही प्रकारचं अन्न खातात. याच अनुकूलन क्षमतेमुळे ते किनारी भागांपासून शहरांपर्यंत सहज राहू शकतात.
एका यूजरनं कमेंट केली की “अरे भाईसाहेब पूर्ण ससा गिळला हा” दुसऱ्यानं विचारलं, “आता हा पचवणार कसा?” तर आणखी एका यूजरनं लिहिलं, “हे दृश्य खरंच भयानक आहे.”
