ही टीम फक्त अनुभव घेऊन परत येत नाही, तर स्पेसमध्ये करण्यात आलेल्या महत्त्वाच्या प्रयोगांचा अमूल्य डेटा आणि वैज्ञानिक उपकरणं घेऊन परत येतेय. अंतराळातून नक्की काय आणायला शुभांशु शुक्ला गेले होते? त्यांचं मिशन काय होतं? या सगळ्याची माहिती मात्र अनेकांना माहित नाही. चला त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.
NASA च्या माहितीनुसार, हे अंतराळवीर 263 किलोहून (580 पाउंड) अधिक वजनाचं वैज्ञानिक साहित्य आणि डेटा सोबत घेऊन येत आहेत. यात NASA चे महत्त्वाचे उपकरणे आणि 60 पेक्षा जास्त प्रयोगांचे निरीक्षण आणि संशोधनात्मक नोंदी समाविष्ट आहेत. हे सर्व प्रशांत महासागरातील कॅलिफोर्नियाजवळ एका ठराविक बिंदूवर कॅप्सूलद्वारे उतरवण्यात आले आहेत.
advertisement
कोण-कोण होते या मिशनमध्ये?
या मिशनसाठी चार जणांची एक आंतरराष्ट्रीय टीम निवडण्यात आली होती:
पायलट: भारताचे शुभांशु शुक्ला (ISRO)
कमांडर: पेगी व्हिटसन (NASA)
मिशन स्पेशालिस्ट: पोलंडचे स्लावोज उज्नान्स्की-विस्नीवस्की
मिशन स्पेशालिस्ट: हंगरीचे टिबोर कापू
या मिशनमुळे भारत, पोलंड आणि हंगरीसारख्या देशांसाठी अंतराळ संशोधनात मोठी झेप घेतल्याचं मानलं जातं.
मिशनचं उद्दिष्ट काय होतं?
या मिशनचं मुख्य उद्दिष्ट जगभरातील 31 देशांनी सुचवलेल्या 60 वैज्ञानिक प्रयोगांचं यशस्वी संचालन आणि त्यातून मिळणाऱ्या डेटाचं संकलन हे होतं. हे प्रयोग अंतराळातील मानव जीवन, आरोग्य, जैविक प्रक्रिया आणि तंत्रज्ञान यावर आधारित होते.
ड्रॅगन कॅप्सूल 25 जून रोजी NASA च्या कॅनेडी स्पेस सेंटरवरून अंतराळात झेपावलं होतं. 8 जुलै रोजी संध्याकाळी 4:45 वाजता ते ISS (International Space Station) पासून विभक्त झालं आणि आता 15 जुलै रोजी दुपारी 3:01 वाजता पृथ्वीवर परत आलं.