TRENDING:

झोपलेल्या महिलेला चावला साप, पोटात वेदना, हॉस्पिटलमध्ये नेताच जन्माला आलं बाळ

Last Updated:

Snake Bite News : रात्र असल्याने घरातील सगळे झोपले होते. त्यामुळे घरात साप घुसल्याचं कुणाला समजलंच नाही. लकीला चावल आणि की बेशुद्ध झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा नवरा नागेंद्रने तिला जिल्हा रुग्णालयात नेलं. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भोपाळ : साप चावल्याच्या बऱ्याच घटना तुम्ही वाचत असाल, ऐकत असाल. आता असंच साप चावल्याचं प्रकरण समोर आलं आहे. एका झोपलेल्या महिलेला साप चावल्याची ही घटना. महिलेला लगेच रुग्णालयात नेण्यात आलं. तिन एका बाळाला जन्म दिला. मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यातील ही घटना चर्चेत आली आहे.
प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
advertisement

3 सप्टेंबरची ही घटना. जिल्हा मुख्यालयाजवळील रेउरा फार्ममध्ये राहणारी 24 वर्षांची लकी दोहार रात्री बेडवर झोपली होती. अचानक तिथं एक साप आला. रात्र असल्याने घरातील सगळे झोपले होते. त्यामुळे घरात साप घुसल्याचं कुणाला समजलंच नाही. लकीला चावल आणि की बेशुद्ध झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा नवरा नागेंद्रने तिला जिल्हा रुग्णालयात नेलं.

advertisement

40 दिवसांत एकाच व्यक्तीला 13 वेळा चावला साप, खरंच असं होऊ शकतं का? विज्ञान काय सांगतं?

लकीला क्रेट्स हा साप चावला होता. तो दिसायला अतिशय सडपातळ आणि प्रचंड लांब असतो. त्याच्या काळ्या शरिरावर पांढरे पिवळसर पट्टे असतात.हा साप प्रामुख्याने रात्रीच्या अंधारात बिळाबाहेर पडतो. व्यक्ती झोपेत असताना तिच्यावर हल्ला करतो. महत्त्वाचं म्हणजे तो चावल्यावर केवळ डास चावल्यासारखं जाणवतं, परंतु त्याचं विष मात्र शरीरभर झपाट्याने पसरतं . तो चावल्यास वेळेत उपचार मिळाले नाही तर व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. म्हणूनच त्याला 'सायलंट किलर' सुद्धा म्हणतात.

advertisement

डॉक्टरांनी सांगितलं की लकीला रुग्णालयात आणलं तेव्हा तिची प्रकृती खूपच गंभीर होती. ऑक्सिजन 50% पेक्षा कमी होता, नाडी आणि रक्तदाबाचा कोणताही मागमूस नव्हता. अशा परिस्थितीत मेडिकल कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक आणि तज्ज्ञ डॉ. बद्री विशाल सिंह यांनी तिला ताबडतोब व्हेंटिलेटरवर ठेवलं. त्याच वेळी औषध विभागाचे प्रमुख डॉ. एलपी सिंह यांचा सतत सल्ला घेण्यात आला.

advertisement

Snake News : मच्छरदाणी लावून झोपला होता तरुण, आता घुसला कोब्रा, बाजूला झोपला अन्...

पण खरं चॅलेंज होतं ते म्हणजे लकी प्रेग्नंट होती, तिच्या पोटात 8 महिन्यांचं बाळ होतं. एकीकडे आईचा जीव वाचवायचा होता, तर दुसरीकडे न जन्मलेल्या बाळालाही सुरक्षितपणे बाहेर काढायचं होतं. उपचारादरम्यान त्याच रात्री व्हेंटिलेटरवर असलेल्या लकी प्रसूती वेदना सुरू झाल्या. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निशात फातिमा खान यांच्या देखरेखीखाली शस्त्रक्रियेद्वारे बाळाची सुखरूप प्रसूती करण्यात आली.

advertisement

यानंतर लकी आयसीयूतच देखरेखीत होती. दोन दिवसांनंतर शुक्रवारी (5 सप्टेंबर) तिने डोळे उघडले. आई आणि बाळ दोघंही निरोगी आहेत, त्यांना लवकरच डिस्चार्ज दिला जाईल, असं डॉक्टरांनी शनिवारी (6 सप्टेंबर) सांगितल्याचं वृत्त नवभारत टाइम्सने दिलं आहे.

मराठी बातम्या/Viral/
झोपलेल्या महिलेला चावला साप, पोटात वेदना, हॉस्पिटलमध्ये नेताच जन्माला आलं बाळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल