TRENDING:

Snake : तो आला, त्यानं पाहिलं आणि अटॅक; फुग्याचं पुढे काय झालं एकदा पाहाच, वारंवार पाहिला जातोय Video

Last Updated:

एक भन्नाट आणि मजेशीर नमुना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतो. ज्यात एक साप फुग्याला आपला शत्रू समजतो आणि मग जे करतो ते पाहून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : साप हा नेहमीच सावध आणि परिस्थिती ओळखून प्रतिक्रिया देणारा प्राणी आहे. तो कधीच कोणावर विनाकारण हल्ला करत नाही. पण जर त्याला धोका वाटला, तर तो आपलं रौद्ररूप दाखवायलाही वेळ लावत नाही. त्याच्या संबंधीत अनेक व्हिडीओ पाहायला लोकांना आवडतात. सोशल मीडियावर देखील सापा संबंधीत अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, असाच एक भन्नाट आणि मजेशीर नमुना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतो. ज्यात एक साप फुग्याला आपला शत्रू समजतो आणि मग जे करतो ते पाहून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल.
व्हायरल व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओ
advertisement

व्हिडिओमध्ये दिसतं की एक साप जमीनवर आहे, फणा काढून फुसफुसतोय. इतक्यात एक माणूस त्याच्या समोर एक रंगीत फुगा ठेवतो. आणि बस.... साप भडकतो. काही क्षण तो त्या फुग्याकडे एकटक बघतो आणि मग एका झटक्यात जोरदार हल्ला करतो!

तो वारंवार फुग्याला दंश करण्याचा प्रयत्न करतो, पण फुगा फुटतच नाही. मात्र त्याच्याच शेजारी बसलेला दुसरा साप शांतपणे पाहत असतो. आणि एकदम योग्य क्षणी फुग्यावर दंश करतो आणि फुगा फुटतो. आवाज होताच पहिला साप घाबरून मागे हटतो. हे दृश्य एकाच वेळी मजेदार आणि थरारक आहे.

advertisement

सोशल मीडियावर लोकांची भन्नाट प्रतिक्रिया

हा व्हिडिओ X (Twitter) वर @NaeemAh78347923 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. “जेव्हा सापाने फुग्याला शत्रू समजलं. एक अॅक्टिव्ह अटॅकर आणि एक कूल ऑब्झर्व्हर!”

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोनं महागलंय, दिवाळीत घ्या हटके अन् स्टायलिश ज्वेलरी, किंमत फक्त 145 रुपयांपासून
सर्व पहा

फक्त 15 सेकंदांच्या या व्हिडिओला 55 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. लोकांनी कमेंट्समध्ये भन्नाट प्रतिक्रिया दिल्या एका यूजरने लिहिलं, “फुग्याला पाहून सापाचा रिअ‍ॅक्शन जबरदस्त होता, वाटतं त्याचा लीडर ‘कन्फ्यूजन कुमार’ आहे.” तर दुसऱ्याने म्हटलं, “शांत बसलेला सापच सगळ्यात खतरनाक निघाला. योग्य वेळी एकदम टार्गेट फिट केलं.”

मराठी बातम्या/Viral/
Snake : तो आला, त्यानं पाहिलं आणि अटॅक; फुग्याचं पुढे काय झालं एकदा पाहाच, वारंवार पाहिला जातोय Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल