TRENDING:

खतरनाक! कोब्रापेक्षा पाचपट विषारी साप, मुंगी चावल्यासारखा डसतो, झटक्यात व्यक्तीचा जीव घेतो

Last Updated:

Most Poisonous Snake: आपल्या भारतात सापांच्या 4 प्रजाती अत्यंत खतरनाक मानल्या जातात. त्यातही एका प्रजातीचे साप डसल्यास अगदी काहीच क्षणांत व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो, असं म्हणतात. त्यामुळे या सापाला 'सायलेंट किलर' म्हणून ओळखलं जातं, त्यांचं नाव असतं 'कॉमन करैत'. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
हे साप रात्री प्रचंड ॲक्टिव्ह असतात.
हे साप रात्री प्रचंड ॲक्टिव्ह असतात.
advertisement

नवी दिल्ली : कॉमन करैत डसल्यावर अगदी मुंगी किंवा मच्छर चावल्यासारखं वाटतं. सर्पमित्र सांगतात, या प्रजातीचे साप कोब्रा सापांपेक्षा पाचपट जास्त विषारी असतात. त्यामुळे ते चावल्यास काही कळायच्या आत व्यक्तीचा जीव जाऊ शकतो. 

सर्पमित्र महादेव पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉमन करैत साप भारतासह बांगलादेश, नेपाळ, अफगाणिस्तान, श्रीलंका, पाकिस्तान, इत्यादी देशांमध्ये आढळतो. भारतातील सर्वाधिक विषारी सापांपैकी एक असा हा साप मानला जातो. विशेष म्हणजे जेव्हा थंडीत इतर साप विश्रांती घेतात, तेव्हाच हे साप प्रामुख्यानं आढळतात. कॉमन करैत साप रात्री प्रचंड ॲक्टिव्ह असतात. त्यांचा दंश झाल्यास शरीरावर त्यांच्या दातांचे निशाणही दिसत नाहीत. केवळ लक्षणांवरून हा साप चावल्याचं कळतं. परंतु लक्षणे जाणवण्याआधीच व्यक्तीचा मृत्यू झालेला असतो किंवा लकवा जातो. 

advertisement

जमिनीवर झोपणाऱ्यांमध्ये कॉमन करैत डसण्याची प्रकरणं सर्वाधिक आढळतात. मानवी शरीराची उब जाणवली की, हे साप जवळ येतात. ते शरीराला पूर्ण चिकटतात आणि जेव्हा व्यक्ती कूस बदलते तेव्हा डसतात. त्यामुळे बहुतांश वेळी या सापांचा दंश व्यक्तीच्या छातीवर, पोटावर किंवा काखेत होतो. उब मिळावी यासाठी हे साप कपड्यांमध्ये किंवा अंथरुणात लपून राहतात. त्यामुळे अंथरुण कायम झटकून अंथरावं.

advertisement

कॉमन करैत डसल्यास काय करावं?

कॉमन करैतचा दंश झाल्यास ताबडतोब व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात दाखल करावं. तिला शांत करावं, घाबरू देऊ नये, चालू-फिरू देऊ नये, त्यामुळे रक्तातून विष पसरणार नाही.

कसा दिसतो कॉमन करैत?

त्याचा रंग काळा, मातेरी असतो. शरीराची त्वचा चमकदार असते. तोंडापासून काही अंतरावर पांढरे डाग असतात. तसंच शरीरावर काही ठिकाणी पांढऱ्या रंगाच्या 2 रांगा असतात. हे साप, उंदीर आणि बेडूक खातात. त्यामुळे शेतांमध्ये सर्वाधिक आढळतात.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
खतरनाक! कोब्रापेक्षा पाचपट विषारी साप, मुंगी चावल्यासारखा डसतो, झटक्यात व्यक्तीचा जीव घेतो
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल