तसं पाहाता साप आणि विंचू दोन्हीच्या विषामुळे मानवाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. साप आणि विंचवाचे विषमध्ये वेगळेपण काय?
सापाचे विष
सापाच्या दंशात न्यूरोटॉक्सिन किंवा हेमोटॉक्सिन असतं. हे विष रक्तावर आणि मज्जातंतूंवर थेट परिणाम करतं आणि शरीरात वेगाने पसरतं. साप दंश करताना मोठ्या प्रमाणात विष सोडतो. त्यामुळे तात्काळ उपचार न झाल्यास मृत्यूही होऊ शकतो.
advertisement
विंचवाचा दंश
विंचवाच्या दंशातसुद्धा न्यूरोटॉक्सिन असतं. तेही मज्जातंतूंवर परिणाम करून शिकार काही वेळातच पेरेलाइज (paralyze) करू शकतं. मात्र विंचू डंख मारताना फारच कमी प्रमाणात विष सोडतो. त्यामुळे त्याचं विष रासायनिकदृष्ट्या तीव्र असलं तरी मृत्यूस कारणीभूत ठरत नाही. काही धोकादायक प्रजाती मात्र जीवघेण्या ठरू शकतात.
प्रजाती आणि धोका
विंचू
जगात सुमारे 2500 प्रजाती सापडतात. त्यापैकी जवळपास 30 प्रजाती अशा आहेत ज्या मानवासाठी खूप धोकादायक मानल्या जातात. मोठ्या आकाराचे विंचू जंगलात किंवा वाळवंटी प्रदेशात आढळतात आणि ते माणसांसाठी धोका ठरू शकतात. त्यांचा डंख प्रखर वेदना, जळजळ, ताप आणि नसांवर परिणाम करतो.
साप
जगात 3000 हून अधिक सापांच्या प्रजाती आहेत. त्यापैकी भारतात सुमारे 300 प्रजाती आढळतात. यांपैकी 7–8 प्रजाती अतिशय विषारी आहेत – उदा. नाग (Cobra), करैत (Krait), रसेल वायपर (Russell’s viper), सॉ स्केल्ड वायपर (Saw-scaled viper). या सापांच्या दंशामुळे मज्जातंतू सुन्न होतात, रक्त गोठतं आणि शरीराचे अवयव काम करणं बंद करतात. त्यामुळे सापाचा दंश विंचवाच्या तुलनेत अधिक प्राणघातक ठरतो.
तज्ज्ञांचं मत
तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, रासायनिक दृष्टिकोनातून विंचवाचं विष अधिक तीव्र आहे. पण शरीरावर परिणामाच्या दृष्टीने पाहिलं, तर सापाचा दंशच जास्त धोकादायक आहे. कारण साप मोठ्या प्रमाणात विष सोडतो, जे पटकन शरीरभर पसरतं. योग्य वेळी उपचार न झाल्यास मृत्यूही संभवतो.
सावधगिरी सर्वात महत्त्वाची
साप असो किंवा विंचू – बचाव हाच सर्वोत्तम उपाय आहे. ज्या भागात हे जीव आढळतात, तिथे चालताना काळजी घ्या. घराच्या कोपऱ्यांची नियमित साफसफाई करा, रात्री झोपण्यापूर्वी बिछान्याची नीट तपासणी करा, चावा किंवा डंख झाल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा. कधीही झाडफुटी, झाडपाला किंवा देसी उपायांवर अवलंबून राहू नका.
एकंदरीत, विंचू आणि साप दोन्ही धोकादायक आहेत, पण प्राणघातकतेच्या बाबतीत सापाचं विष जास्त घातक ठरतं.