अशाच एका अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. जो अंगावर काटा आणणारा आहे. काही कळायच्या आतच बाईक ही बसला धडकली आणि बाईक चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात खूपच धोक्कादायक आहे, जो तुमच्या हृदयाचा ठोका चुकवतो.
या अपघात सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेकॉर्ड झाला. एक तरुण बाईकस्वार क्षणात मृत्यूच्या तावडीत सापडलेला दिसतो. हा प्रकार उत्तराखंडातील हल्द्वानीच्या गोलापार भागात घडला असून, शनिवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ही धडक बसली.
advertisement
व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की रस्त्यावर एक प्रायव्हेट बस नेहमीच्या गतीने चालत होती, तेवढ्यात समोरून आलेल्या अतिवेगवान बाईकस्वाराने आधी एका दुसऱ्या बाईकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा वेग जास्त होता आणि समोरुन बस आल्यामुळे त्याला पुढे जायला दुसरी जागा मिळाली नाही आणि तो थेट बसला धडकला. धडकेचा जोर एवढा होता की बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
सुमारे दहा सेकंदांचा हा व्हिडिओ हा एक उदाहरण आहे की तुमची एक लहान चुक देखील किती महागात पडू शकते. हा भीषण अपघाताचा व्हिडिओ एक्सवर @SANJAYTRIPATHI नावाच्या हँडलवरून शेअर करण्यात आला असून, त्यात लिहिलं आहे – जेव्हा स्पीडचं वेड मृत्यूचं कारण बनतं.
हा व्हिडिओ पाहून एका युजरने प्रतिक्रिया दिली बाईकस्वाराचीच चूक होती, बस कदाचित 40 च्या आसपास गतीने चालत असावी. दुसऱ्याने लिहिलं जीवन खूप मौल्यवान आहे, याचा खेळ करू नकोस भावा.
