TRENDING:

भरधाव ट्रकनं बाईकला ठोकलं, गाडीला रस्त्यावर फरफट नेलं; Video आणेल अंगावर काटा

Last Updated:

ही घटना सोमवारी हैदराबादमधील रहदारीच्या इनर रिंग रोडवरील ओवैसी रुग्णालयाजवळ घडल्याचे सांगितले जात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बरेचदा विचित्र रस्ते अपघाताचे व्हिडिओ व्हायरल होतात. असे अपघात नक्कीच धक्कादायक असतात. हैदराबादमधील एका रस्ते अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एका भरधाव ट्रकने बाईकस्वाराला धडक दिली. तसेच त्याला ट्रकच्या पुढच्या चाकाखाली फरफटत नेत असल्याचं दिसतं. हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी कारवाई करत ट्रक ड्रायव्हरला ताब्यात घेतलं आहे.
व्हायरल व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओ
advertisement

ही घटना सोमवारी हैदराबादमधील रहदारीच्या इनर रिंग रोडवरील ओवैसी रुग्णालयाजवळ घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ एक्स प्लॅटफॉर्मवर रविकुमार नावाच्या युजरने पोस्ट करत ट्रक ड्रायव्हरवर कारवाईची मागणी केली. तसेच या युजरनं संबंधित अधिकाऱ्यांना देखील यात टॅग केलं. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत ट्रक ड्रायव्हरला ताब्यात घेतलं.

या घटनेचे व्हिडिओ एक्स हँडलवर @V24751Vadlamundi या अकाउंटवर 15 एप्रिलला पोस्ट करण्यात आले. युजरनं कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, सर, व्हिडिओ पहा. ही घटना हैदराबादच्या ओवैसी रुग्णालयाजवळील एलबी नगर ते हयात नगर मार्गावर घडली आहे. कृपया या मार्गावरील सर्व पोलीस स्टेशनला अलर्ट करा. त्यानंतर @hycitypolice ने यावर रिप्लाय दिला आणि लिहिलं की, आम्ही घटनेची माहिती घेत आहोत. वृत्त लिहेपर्यंत ही पोस्ट चार हजारांहून अधिक जणांनी पाहिली. तिला 21 लाइक्स मिळाले. तसेच अनेक युजर्सने त्यावर कमेंट ही केली.

advertisement

या प्रकरणी @RachakondaCop या अधिकृत एक्स हँडलवरून सांगण्यात आलं की, शुभ प्रभात सर, काल मध्यरात्री आयएस सदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक दुर्घटना घडली. त्यात एका ट्रकने एका बाईकला धडक दिली आणि सुमारे 500 मीटरपर्यंत बाईकला फरफटत नेले. रवि कुमार नावाच्या एका प्रवाशानं ही घटना पाहिली आणि तिचा व्हिडिओ चित्रित करून एक्सवर पोस्ट केला. माहिती मिळताच आमच्या व्हॉट्सअॅप कंट्रोल रुमने तात्काळ वनस्थलीपुरमचे एनझेडओ वेणुगोपाल आणि त्यांच्या पथकाला सतर्क केले. पथकाने ट्रकचा पाठलाग करत वनस्थलीपुरम पोलीस स्टेशनच्या हद्दीत ट्रक चालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीला आयएस सदान पोलिसांच्या ताब्यात दिले.

advertisement

भरधाव ट्रकने बाईक नेली 500 मीटरपर्यंत फरफटत, व्हिडीओसाठी इथे क्लिक करा

या व्हायरल व्हिडिओत, रात्रीच्या वेळी रहदारीच्या रस्त्यावर एक ट्रक भरधाव वेगात चालत असून त्याच्या फूटबोर्डवर एक व्यक्ती उभी असल्याचे दिसते. त्याचवेळी ट्रकने एका बाईकला जोरदार धडक दिली. बाईक ट्रकच्या पुढच्या भागात अडकली. पण ड्रायव्हरने ट्रक थांबवला नाही. त्यावेळी रस्त्यावर ठिणग्या उडताना दिसत आहे. रस्त्यावरून जात असलेल्या एका प्रवाशानं या घटनेचा व्हिडिओ शूट केला. अचानक बाईक ट्रकच्या पुढच्या भागातून निसटून जाताना व्हिडिओत दिसते. यामुळे मोठी दुर्घटना घडली असती.

advertisement

दरम्यान, आयएस सदान पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 279 अंतर्गत Cr. No. 119/2024 अंतर्गत घटनेची नोंद करण्यात आली. सजग नागरिक रवि कुमार, आयटी सेल आणि निरीक्षक वेणूगोपाल तसेच त्यांच्या पथकाने तात्काळ कारवाई केल्याने मोठी दुर्घटना टळली.

मराठी बातम्या/Viral/
भरधाव ट्रकनं बाईकला ठोकलं, गाडीला रस्त्यावर फरफट नेलं; Video आणेल अंगावर काटा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल