ही विचित्र घटना पोर्टलँडजवळील हॅपी व्हॅली नावाच्या परिसरात घडली. एका घरात सतत विचित्र आवाज येत होते. घरमालकाने हे आवाज ऐकले होते. पोलिसांनी घरावर छापा टाकला तेव्हा हे दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला.
माझी बायको! नवऱ्यांनी पोस्ट केले पत्नींचे फोटो, पाहून पोलीसही शॉक, फेसबुक ग्रुपच बंद केला, पण का?
रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना माहिती दिली की एक अज्ञात व्यक्ती कारमधून उतरून थेट एका घराच्या मागच्या बाजूला गेली. प्रत्यक्षदर्शीने पाहिलं तेव्हा त्याला आढळलं की घराखालील क्रॉल स्पेसचा दरवाजा उघडा होता आणि आतून प्रकाश येत होता पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा दरवाजा तुटलेला होता आणि कुलूप बदललेलं होतं. एका व्हेंटमधून एक विजेची तार आत जाताना दिसली. यामुळे संशय आणखी बळावला.
advertisement
जेव्हा दरवाजा तोडला तेव्हा आतील दृश्य एखाद्या मिनी अपार्टमेंटसारखं होतं. टीव्ही, चार्जर, लाईट आणि बेड सर्व तिथे होतं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार बेन्जामिन बुकर नावाचा 40 वर्षीय माणूस बराच काळ तिथे राहत होता. चौकशीत असं दिसून आलं की तो घरातून वीजही चोरत होता. पोलिसांच्या झडतीदरम्यान, तिथून एक मेथ पाईप देखील जप्त करण्यात आली. याचा अर्थ असा की तो माणूस केवळ बेकायदेशीरपणे राहत नव्हता, तर तो ड्रग्जचं साहित्य देखील ठेवत होता. त्याला ताबडतोब अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलं.
40 दिवसांत एकाच व्यक्तीला 13 वेळा चावला साप, खरंच असं होऊ शकतं का? विज्ञान काय सांगतं?
घरमालक म्हणाला, त्याला विचित्र आवाज येत होते, पण ते फार गांभीर्याने घेतले नाहीत. पण वास्तव काहीतरी वेगळंच असल्याचं दिसून आलं. त्याला माहित नव्हतं की त्याच्या घराखाली कोणीतरी राहत आहे.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. इतर लोकही घाबरले आहेत आणि लोक आता त्यांच्या घरांच्या क्रॉल स्पेस तपासत आहेत.