चालू गाडीवर स्टंटबाजी करतानाचा व्यक्तीचा व्हिडीओ समोर आलाय. व्हिडीओ बनवण्याच्या नादात त्यानं आपला जीवही धोक्यात टाकलाय. चालू गाडीत तो ड्रायव्हिंग सीटवरुन उठून थेट कारवर चढतो आणि उभा राहतो. हे दृश्य खूप भयानक आहे.
Human Body: शरीराचा असा भाग जो अंत्यसंस्कार झाल्यानंतरही जळत नाही!
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, व्यक्ती हायवेवर गाडीची ड्रायव्हिंग सीट सोडून वर चढतो. गाडीवर उभा राहून तो स्टंटबाजी करतोय. मागून कोणीतरी व्यक्तीचा व्हिडीओ शूट करत आहे. गाडीचा तोल गेला असता तर मोठा अपघात घडू शकत होता. अशी स्टंटबाजी करणाऱ्यांवर लोक संताप व्यक्त करत आहे.
advertisement
हायवेवर व्यक्तीची स्टंटबाजी जीवघेणीही ठरु शकली असते. गाडीच्या नंबरवर असलेल्या नंबरवरुन हा व्हिडीओ राजस्थानमधील झालावाडचा असल्याचं समजतंय. व्हिडीओ व्हायरल होताच व्हिडीओवर अनेक कमेंट येताना दिसत आहे. अशा घटनांमध्ये होणारी वाढ पाहून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.