एक युट्यूबर कार चालवताना Live stream करक होता, जेव्हा त्याची एक चूक त्याला भोवली ज्यामुळे त्याच्या कोट्यवधीच्या सुपर कारचा चुरा झाला. या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली. ज्यामुळे हा व्हिडीओ आता वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रेंड होत आहे.
जॅक डोहर्टी हा एक लोकप्रिय YouTuber आणि Kickstreamer आहे, मियामीमध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग दरम्यान, जॅकने त्याची 1.7 कोटींची सुपरकार मॅक्लारेन रस्त्याच्या कडेला क्रॅश केली. या व्हिडीओमुळे युजर्समध्ये नाराजी आहे.
advertisement
5 ऑक्टोबर रोजी, 20 वर्षीय जॅक पावसात मियामी हायवेवर गाडी चालवत होता. गाडी चालवण्याबरोबरच तो त्याच्या फोनकडेही पाहत होता. यादरम्यान निसरड्या रस्त्यावर कारचा वेग वाढल्याने त्याचे नियंत्रण कारवरुन सुटले.
व्हिडिओमध्ये जॅकनाही..नाही..नाही म्हणताना तुम्ही ऐकू शकता ज्यानंतर पुढे व्हिडीओमध्ये सुपर कारचा कसा चुरा झाला हे तुम्ही पाहू शकता. लाईव्ह स्ट्रिमिंग दरम्यान ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जी सोशल मीडियावर नंतर वाऱ्यासारखी पसरली.