तामिळनाडूत आठवीच्या दलित मुलीसोबत घडलेला हा प्रकार. ही मुलगी कोइम्बतूरच्या सेनगुट्टैपलयम येथील स्वामी चिद्भवानंद मॅट्रिक उच्च माध्यमिक शाळेत शिकते. मीडिया रिपोर्टनुसार, 5 एप्रिल 2024 रोजी तिची मासिक पाळी आली, तेव्हा तिची परीक्षा सुरू होती. यानंतर मुख्याध्यापिकेने तिला वर्गाबाहेर बसून परीक्षा देण्यास सांगितलं.
अशी फॅमिली पाहिली नसेल! सासू सिगारेट देते, सून सासऱ्यांसोबत कश मारते
advertisement
या घटनेचा 1.22 मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये मुलगी पायऱ्यांवर बसून परीक्षा देताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती मुलगी एका महिलेशी बोलताना ऐकू येते. ती महिला मुलीची आई असल्याचं सांगितलं जात आहे. मुलगी म्हणते, मुख्याध्यापकांनी मला इथे (पायऱ्यांवर) बसून परीक्षा द्यायला सांगितलं. मुलीने असंही सांगितलं की बाहेर बसून परीक्षा देणं असं पहिल्यांदाच घडलेलं नाही. मुख्याध्यापिका मला परीक्षेसाठी वेगळ्या ठिकाणी घेऊन गेली.
दरम्यान आईने स्वतः बाहेर बसून परीक्षा देण्यास सांगितलं होतं असा शाळा प्रशासनाचा दावा आहे की मुलीच्या आईला परीक्षेदरम्यान बाहेर बसायचं होतं. आई म्हणाली की, मला फक्त मुलीला वेगळं बसवून परीक्षा द्यायची होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. शाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आलं आहे.
नवरा तर नवरा सासूलाही सोडलं नाही, सुनेचं कृत्य पाहून अख्खं सासर थरथर कापू लागलं
तामिळनाडूचे शालेय शिक्षण मंत्री अनबिल महेश म्हणाले की, शाळेविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. शाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आलं आहे. कोणत्याही परिस्थितीत मुलांवर होणारे अत्याचार सहन केले जाणार नाहीत. मुलांवर कोणत्याही प्रकारच्या दबावाबाबत आमचं शून्य सहनशीलतेचं धोरण आहे.
वृत्तानुसार, खाजगी शालेय शिक्षण संचालक डॉ. एम. पलामिसामी यांच्याविरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली आहे. जर काही चुकीचं आढळलं तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.