टीसीएसने पुढील वर्षी त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये सुमारे 12000 कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे, जे त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या अंदाजे 2% आहे. कपातीचं कारण कंपनीनं अनेक कर्मचाऱ्यांमध्ये कौशल्यांचा अभाव असल्याचं सांगितलं आहे. ज्यांना बदलत्या जागतिक गरजा आणि ग्राहकांच्या मागण्यांशी त्यांचं कौशल्य विसंगत वाटत आहे. कंपनीला त्यांची टीम चपळ आणि भविष्यासाठी सज्ज राहावी असं वाटतं.
advertisement
ज्यांचे कौशल्य आता बदलत्या तंत्रज्ञानाशी आणि ग्राहकांच्या मागणीशी जुळत नाही. त्यांना कंपनी अशा आकर्षक सेवानिवृत्ती पॅकेज देत आहे, हे पॅकेज 6 महिन्यांच्या पगारापासून ते जास्तीत जास्त 2 वर्षांच्या पगारापर्यंत असतील.
कोणाला किती पॅकेज मिळेल?
-बेंच कर्मचारी (8 महिने विना प्रोजेक्ट) : फक्त 3 महिन्यांचा पगार नोटीस पीरियड पे म्हणून मिळेल.
-10 ते 15 वर्षे सेवा असलेले कर्मचारी : त्यांना अंदाजे 1.5 वर्षांच्या पगाराइतकं पॅकेज मिळेल.
-15 वर्षांपेक्षा जास्त सेवा असलेले वरिष्ठ कर्मचारी : त्यांना 1.5 ते 2 वर्षांच्या पगाराइतकं सेव्हरन्स पॅकेज मिळू शकतं.
पण नोकरीवरून काढण्याचे आणि त्यानंतर पगार देण्याबाबतचे नियम प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे तुमच्या कंपनीने तुम्हाला नोकरीवरून काढलं तर पगार मिळेलच असा दावा न्यूज18मराठी करत नाही.
नोकरीवरून काढण्याची बेकायदेशीर पद्धत
1. भेदभाव : बेकायदेशीरपणे नोकरीवरून काढून टाकण्याची अनेक कारणं असू शकतात. यातील मुख्य कारण म्हणजे भेदभाव. हा भेदभाव जात, वय, लिंग, राष्ट्रीयत्वाच्या आधारावर असू शकतो. कर्मचारी एचआयव्ही/एड्सग्रस्त असल्यामुळे त्याला कामावरून काढून टाकणंदेखील बेकायदेशीर आहे. हे कर्मचार्यांच्या अधिकारांचं उल्लंघन आहे.
2. कराराचा भंग : कंपनी आणि कर्मचारी यांच्यात नोकरीसंबंधी एक करार होऊन त्यावर स्वाक्षरी केली जाते. त्या कराराचं पालन दोघांनीही केलं पाहिजे. जर कंपनीनं त्या कराराच्या अटींचं उल्लंघन केलं आणि कर्मचार्याला कामावरून काढून टाकलं, तर ते बेकायदेशीर ठरतं.
3. वैयक्तिक पूर्वग्रह आणि इतर घटक : कोणत्याही वादामुळे कर्मचार्याला नोकरीवरून काढून टाकल्यास ते बेकायदेशीर मानलं जातं. या कारणांतर्गत व्यक्तीची तक्रार किंवा कंपनीने चुकीच्या आदेशांवर कारवाई करण्यास नकार देणं आदींचा समावेश आहे.