TRENDING:

14 वर्षांची मुलगी झोपून उठली आणि मारला लकवा, डॉक्टरांनीही हार मानली पण 3 महिन्यांनी घडला चमत्कार

Last Updated:

Teenage girl paralysed : तिला ट्रान्सव्हर्स मायलाईटिसचं निदान झालं.अनेक चाचण्यांनंतर डॉक्टरांनीही हार मानली होती. डॉक्टरांनी सांगितलं की ती पुन्हा कधीही चालू शकणार नाही. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : जगभरात कित्येक लोकांच्या अशा कथा आहेत ज्यांना आजारांनी ग्रासलं, ज्यांच्यावर उपचार केल्यानंतर डॉक्टरांनीही हार मानली होती, पण नंतर चमत्कारिकरित्या त्यांचे प्राण वाचले. असंच एक प्रकरण चर्चेत आलं आहे. अवघ्या 14 वर्षांची मुलगी, जी रात्री झोपली तेव्हा नीट होती पण सकाळी उठताच तिला लकवा मारला. डॉक्टरांनीही हार मानली होती. पण ती चमत्कारिकरित्या बरी होत आहे.
प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
advertisement

जेसी-लू हार्वे असं या मुलीचं नाव आहे. स्कॉटलंडमधील लॅनार्कशायरमधील ब्लँटायर इथं राहणारी 14 वर्षांची जेसी एक हेल्दी आणि अॅक्टिव्ह मुलगी होती. पण 10 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी सगळं काही बदललं.

जेसी-लू म्हणाली, "मला पायात भयानक कमजोरी जाणवत होती. मी बाथरूममध्ये जाण्याचा प्रयत्न केला, पण मी इतकी अशक्त होते की मला काय चाललंय ते समजत नव्हतं. मी अर्धा तास अंथरुणावर पडून राहिले आणि नंतर मला छातीपासून पूर्णपणे अर्धांगवायू झाला. मला अजिबात हालचाल करता येत नव्हती."

advertisement

ती दुसऱ्या दिवशी सकाळी उठली तेव्हा तिला आढळलं की तिला छातीपासून खालपर्यंत अर्धांगवायू झाला आहे. तिचे वडील, टोनी, जे एक सिव्हिल इंजिनिअर आहेत त्यांनी तिला गाडीत बसवलं आणि तिला तातडीने डॉक्टरांकडे नेलं. तिथून तिला अॅम्ब्युलन्सने ग्लासगोच्या रॉयल हॉस्पिटल फॉर चिल्ड्रनमध्ये नेण्यात आलं.

प्राणी चावणं परवडला पण माणूस नको, इतका भयंकर परिणाम पाहून सगळे घाबरले

advertisement

ग्लासगोमध्ये काही आठवडे चाचण्या केल्यानंतर आणि लंडनमधील ग्रेट ऑरमंड स्ट्रीट हॉस्पिटलमध्ये कॉन्फरन्स कॉल केल्यानंतर मार्च 2024 मध्ये तिला ट्रान्सव्हर्स मायलाईटिसचं निदान झालं. ही एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल स्थिती आहे ज्यामुळे पाठीच्या कण्याला सूज होते. राष्ट्रीय आरोग्य संस्थांनुसार हे दशलक्षांपैकी एकाला प्रभावित करते.

अनेक चाचण्यांनंतर डॉक्टरांनीही हार मानली होती. डॉक्टरांनी सांगितलं की ती पुन्हा कधीही चालू शकणार नाही.  निकोला म्हणाली, "डॉक्टरांनी सांगितलं की आमची निरोगी मुलगी कधीच चालू शकणार नाही. आम्ही हताश झालो होतो. माझ्या हेल्दी मुलीला अचानक अर्धांगवायू कशी होऊ शकतो?"

advertisement

निकोलाला या रिपोर्ट्सबाबत शंका होती आणि तिने स्वतःची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आणि फेसबुक ग्रुप्सकडून पाठिंबा मिळवला. 12 आठवड्यांपर्यंत जेसी-लू ग्लासगोमधील तिच्या हॉस्पिटलच्या खोलीत बंदिस्त होती, फक्त फिजिओ सत्रांसाठी आणि प्लेवर्कर चेल्सीसोबत अॅक्टिव्हिसाठी बाहेर जात होती. 12 आठवड्यांच्या अखेरीस तिला व्हीलचेअरवर आणण्यात आलं होतं, फिजिओथेरपी दरम्यान झिमर फ्रेमच्या मदतीने ती पावलं उचलत होती.

advertisement

Chanakya Niti : कुणालाच माहिती नाही, 20, 30, 50 वयातील सीक्रेट, चाणक्यनीतीत सांगितलंय

पण आयसोलेशनमुळे निकोलाने मे 2024 मध्ये बकिंगहॅमशायरमधील स्टोक मँडेव्हिल हॉस्पिटल, नॅशनल स्पाइनल इंज्युरीज सेंटरमध्ये रेफरलची विनंती केली. तिथें जेसी आणि तिची आई अशाच प्रकारच्या आजार असलेल्या मुलांना भेटल्या. जेसी दिवसातून चार तास ग्रुप व्हीलचेअर स्पोर्ट्समध्ये सहभागी झाली. तिला जिममध्ये फिजिओथेरपी, कमी वजन उचलणारी ट्रेडमिल आणि फंक्शनल इलेक्ट्रॉनिक उत्तेजन मिळालं. सेंटरच्या बागेत संगीत, छायाचित्रण आणि कला कार्यशाळा आयोजित केल्या गेल्या आणि तिने हॉस्पिटलच्या शाळेत शिक्षण घेतलं. पाठीच्या दुखापतीसह जीवनाशी जुळवून घेण्याचं वर्ग देखील होते.

आई निकोलाच्या चिकाटीने आणि एका विशेषज्ञ केंद्राच्या मदतीने जेसीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे आणि ती चमत्कारिकरित्या बरी होत आहे.

जून 2024 मध्ये स्टोक मँडेव्हिल येथून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, ती तिचे वडील आणि सेंट बर्नाडूडल कुत्रा मिलो यांनी भेटली. पण तिला 19 वर्षांपासून दरवर्षी साप्ताहिक तपासणीसाठी परत यावं लागत असे. "कुटुंबासह घरी परतणं आणि दररोज मिलोला पाहणं खूप आनंददायी होतं," असं ती म्हणाली. जेसी-लू आता मदतीशिवाय चालू शकते, परंतु अजूनही ती अपंग आहे, परंतु तिला स्वतःसाठी खूप आशा आहेत.

मराठी बातम्या/Viral/
14 वर्षांची मुलगी झोपून उठली आणि मारला लकवा, डॉक्टरांनीही हार मानली पण 3 महिन्यांनी घडला चमत्कार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल