TRENDING:

पुरुषांना डेटिंगवर बोलवून परीक्षा घेते ही तरुणी, सोडवायला देते पेपर, फेल झाले तर...

Last Updated:

प्रेमात परीक्षा द्यावी लागते म्हणतात. पण प्रेमाची परीक्षा तशी वेगळी असते. ही तरुणी तर खरंच पुरुषांकडून पेपर सोडवून घेते. डेटिंगआधी ती परीक्षा घेते. यासाठी ती पेपर तयार करते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : आतापर्यंत तुम्ही नोकरीसाठी परीक्षा आणि मुलाखतींबद्दल ऐकलं असेलच पण एक तरुणी चक्क बॉयफ्रेंड निवडण्यासाठी परीक्षा घेते आहे. तसं प्रेमात परीक्षा द्यावी लागते म्हणतात. पण प्रेमाची परीक्षा तशी वेगळी असते. ही तरुणी तर खरंच पुरुषांकडून पेपर सोडवून घेते. डेटिंगआधी ती परीक्षा घेते. यासाठी ती पेपर तयार करते.
News18
News18
advertisement

कॅन्डिस क्लोस असं या महिलेचं नाव आहे. 24 वर्षांची कॅन्डिस एक मॉडेल आहे. तसंच ती जगातील सगळ्यात जास्त आयक्यू असलेल्या लोकांच्या मेन्सा सोसायटीची सदस्य आहे. तिनं आपला आयक्यू लेव्हल 136 असल्याचा दावा केला आहे. तिला तिच्या जोडीदाराची बुद्धिमत्ताही तिच्याइतकीच जुळणारी हवी आहे.

OYO hotel : Free Free Free! ओयो हॉटेलमध्ये रूम फ्री, पैसे न देता राहण्यासाठी असं करा बुकिंग

advertisement

गेल्या 3 वर्षांपासून ती बॉयफ्रेंड शोधत आहे. पण तिला कोणीही सापडला नाही. कारण ती त्यांची आयक्यू टेस्ट घेते. त्यात फक्त 120 किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्यांचाच विचार करते. बहुतेक मुलं या परीक्षेत पास झाली नाहीत.

कँडिसने सांगितलं ती शब्दांच्या चुकीच्या उच्चारांवरही ती मुलांना दुरुस्त करायची. पण आता तिला पश्चात्ताप होतो की ती मिस्टर राईटच्या शोधात परीक्षापत्रिका सोडवायची.

advertisement

Seema Haider Baby born : सीमा हैदर - सचिनने दिली Good News, पाचव्या मुलाचा जन्म

आता तिनं हा दृष्टिकोन सोडून दिला आहे. ज्यामुळे ताण कमी झाला आहे आणि डेटिंग थोडं अधिक मनोरंजक झालं आहे. बऱ्याचदा मुलांना माझ्या प्रश्नांची उत्तरं माहित नसतील पण ते दुसऱ्या विषयात चांगले असतील, असं ती म्हणते.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
पुरुषांना डेटिंगवर बोलवून परीक्षा घेते ही तरुणी, सोडवायला देते पेपर, फेल झाले तर...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल