TRENDING:

'हे' आहेत जगातील सर्वांत निर्भीड पक्षी; माणसंच काय धोकादायक प्राण्यांवरसुद्धा करतात हल्ला

Last Updated:

जगात असे अनेक पक्षी आहेत,जे माणसाला घाबरतनाहीत. काही पक्षी तर माणसं जवळ आल्यावर देखील हालचाल करत नाहीत. पण काही पक्षी आपल्या घरट्याचं किंवा पिलाचं संरक्षण करताना आपलं उग्र रूप दाखवतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : जगात असे अनेक पक्षी आहेत,जे माणसाला घाबरतनाहीत. काही पक्षी तर माणसं जवळ आल्यावर देखील हालचाल करत नाहीत. पण काही पक्षी आपल्या घरट्याचं किंवा पिलाचं संरक्षण करताना आपलं उग्र रूप दाखवतात. प्रसंगी ते मोठमोठ्या शिकारी प्राण्यांशी सामना करायला देखील मागं-पुढं पाहात नाहीत.
जगतील सर्वांत निर्भीड पक्षी
जगतील सर्वांत निर्भीड पक्षी
advertisement

जगातील अनेक पक्षी सहसा कोणत्याही धोक्याची पूर्वसूचना देतात आणि उडून जातात किंवा जवळ कुठेतरी लपून बसतात. पण काही पक्षी असे असतात जे बिल्कुल घाबरत नाहीत. त्यांना एखाद्या माणासापासूनही धोका जाणवत नाही. एकतर त्यांना निर्भय,शूर किंवा मूर्ख पक्षी असं म्हणू शकतो. अशा काही पक्ष्यांविषयी सविस्तर जाणून घेऊया.

उत्तर अमेरिकेत आढळणारा नॉर्दर्न मॉकिंगबर्ड हा सर्व भक्षी पक्षी आहे. हे पक्षी जेव्हा घरट्याचं रक्षण करत असतात,तेव्हा त्यांचे वर्तन निर्भय स्वरुपाचं असतं. यासाठी ते बऱ्याचदा अगदी मोठ्या शिकारी प्राणी किंवा मानवाला देखील टक्कर देतात. हे पक्षी सामान्यतः खूप बुद्धिमान असतात. ते इतर पक्ष्यांना त्यांच्या आवाजाची नक्कल करून हा प्रदेश माझा आहे असा संदेश देत असतात.

advertisement

Snake Video : किस केलं, तोंडात घातलं मग गळ्यात गुंडाळलं; सापाला खेळणं समजून खेळत होता चिमुकला

नॉर्दर्न गोसहॉक हा बहिरी ससाणा प्रजातीतील आहे. त्याचे पंख विस्तीर्ण आणि शेपटी लांब असते. त्यामुळे गोसहॉक खूप सुंदर दिसतात. जेव्हा पिलांचं संरक्षण करत असतात,तेव्हा ते जास्त धोकादायक बनतात. आपल्या घरट्याचं रक्षण करताना,घरट्यावर हल्ला करणाऱ्या कोणत्याही प्राण्यावर ते पूर्ण ताकदीनं तुटून पडतात.

advertisement

कॅनडा जे हा पक्षी ग्रे जे किंवा व्हिस्की जॅक या नावानं देखील ओळखला जातो. हा पक्षी राखाडी,काळा आणि भगव्या रंगाचा असतो. कावळा या प्रजातीतील असतो. ते खाद्यासाठी कोणत्याही ठिकाणी हल्ला करतात. हा पक्षी माणसाला अजिबात घाबरत नाही. जेव्हा एखादी व्यक्ती त्याला खाण्याचं आमिष दाखवून जवळ बोलवते,तेव्हा ग्रे जे न घाबरता त्या व्यक्तीजवळ जातो.

advertisement

आफ्रिकेत आढळणाऱ्या शूबिल स्ट्रोक पक्ष्याचा चेहरा काहीसा विचित्र असतो. पूर्वी एखादा प्राणी असावा असा या पक्ष्याचा चेहरा दिसतो. त्याची चोच मोठी असल्यानं तो शूबिल या नावानं ओळखला जातो. हा माणसाला घाबरत नाही. शूबिल पक्षी अगदी मगरीच्या शरीरावर उभं राहायलासुद्धा मागं-पुढं पाहात नाही.तसेच तो मगरीच्या पिलाची शिकारदेखील करतो. तसेच शूबिल पक्षी साप आणि माशांना आपलं भक्ष्य बनवतो.

advertisement

साउथ पोलर स्कूआ हा एक मोठा सागरी पक्षी आहे. 50 ते 55 सेमी उंचीचा हा पक्षी दक्षिण महासागरात आढळतो. हा पक्षी प्रामुख्याने शिकारी पक्षी म्हणून ओळखला जातो. तो दुसऱ्या पक्षांची अंडी तसेच मोठ्या पक्ष्यांना खातो. त्याच्या घरट्याजवळ कितीही धोकादायक प्राणी आला तर तो त्याच्यावरसुद्धा हल्ला करतो.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात पुन्हा झाली वाढ, सोयाबीन आणि कांद्याला काय मिळाला आज भाव? Video
सर्व पहा

युरोप,आशिया,आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात आढळणारा ब्लॅक काइट हा पक्षी मध्यम आकाराचा अर्थात 44 ते 66 सेमीचा रॅप्टर असतो. हा पक्षी फार लवकर माणसाच्या जवळ राहायला शिकतो. ब्लॅक काइट हा इतका निर्भय असतो की प्रसंगी तो माणसाच्या हातातलं अन्न हिसकावून घेत उडून जातो. हा पक्षी आगीलासुद्धा फारसा घाबरत नाही. ऑस्ट्रेलियातील जंगलांमध्ये वणवा लागलेला असला तरी त्याच्या आसपास हा पक्षी उडताना दिसतो. आपली शिकार आगीपासून पळेल आणि आपण त्याची लगेच शिकार करू,याची ब्लॅक काइटला पूर्ण खात्री असते.

मराठी बातम्या/Viral/
'हे' आहेत जगातील सर्वांत निर्भीड पक्षी; माणसंच काय धोकादायक प्राण्यांवरसुद्धा करतात हल्ला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल