Snake Video : किस केलं, तोंडात घातलं मग गळ्यात गुंडाळलं; सापाला खेळणं समजून खेळत होता चिमुकला

Last Updated:

साप हा विषारी आणि धोकादायक प्राणी आहे. सापाच्या हल्ल्यात लोकांचा जीवही जातो. त्यामुळे अनेकांना सापाचं नाव घेतलं तरी घाम फुटतो. सापांना हाताळण्याचा अनुभव असल्याशिवाय लोक त्याच्या जवळही जात नाही.

सापाला खेळणं समजून खेळत होता चिमुकला
सापाला खेळणं समजून खेळत होता चिमुकला
नवी दिल्ली : साप हा विषारी आणि धोकादायक प्राणी आहे. सापाच्या हल्ल्यात लोकांचा जीवही जातो. त्यामुळे अनेकांना सापाचं नाव घेतलं तरी घाम फुटतो. सापांना हाताळण्याचा अनुभव असल्याशिवाय लोक त्याच्या जवळही जात नाही. मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक चिमुकला सापासोबत खेळताना दिसला. तो सापाला खेळणं समजून खेळत असल्याचं धक्कादायक दृश्य पहायला मिळालं.
धोकादायक सापासोबत चिमुकला खेळतोय. एक व्यक्ती या चिमुकल्याचा व्हिडीओ काढत आहे. व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी मुलाकडे लक्ष न दिल्यामुळे संताप व्यक्त केलाय.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, चिमुकला सापासोबत खेळणं असल्याप्रमाणे खेळत आहे. त्याला समजतही नसेल की हा साप किती धोकादायक प्राणी आहे. तो त्याला तोंडातही घालतो, त्याचा किस घेतो, त्याला गळ्यात घालून मिरवतो. पाहतानाही अंगावर काटा येतो.
advertisement
jajara_sarkar नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काहीच वेळात व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. व्हिडीओवर अनेक कमेंटही येत आहे.
advertisement
दरम्यान, व्हिडीओ नीट पाहिला तर कळेल की तो साप छोटा किंग कोब्रा आहे. कदाचित त्याचं विष काढलं असावं. मात्र अशा धोकादायक प्राण्यांना लहान मुलांकडे देणं खूप भयानक आहे. काहीही घडू शकतं.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Snake Video : किस केलं, तोंडात घातलं मग गळ्यात गुंडाळलं; सापाला खेळणं समजून खेळत होता चिमुकला
Next Article
advertisement
ZP Election: मोठी बातमी!  जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय?
मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश र

  • सुप्रीम कोर्टाची मुदत ओलांडली जाण्याचे संकेत होते

  • लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

View All
advertisement