आजच्या काळात, फार कमी लोक भूतांवर विश्वास ठेवतात, पण जगात काही अशी ठिकाणे आहेत जी लोकांना विचार करायला भाग पाडतात. अशीच एक शापित खुर्ची आहे ज्याबद्दल असे म्हटले जाते की, त्यावर बसलेल्या व्यक्तीचा अकाली मृत्यू होतो. जर तुम्हालाही ही अनोखी खुर्ची पहायची असेल, तर प्रथम तिची कथा आणि ती शापित का मानली जाते हे जाणून घ्या.
advertisement
असे म्हटले जाते की, यूकेमधील या खुर्चीला "डेथ चेअर" म्हणतात. कारण जो कोणी त्यावर बसतो तो जिवंत राहत नाही. तुम्हाला वाटत असेल की. खुर्चीवर बसून कोणी कसे मरू शकते? खरं तर, ही अलीकडची घटना नाही, तर 300 वर्षांपूर्वीची कथा आहे, जी आजही लोकांमध्ये प्रचलित आहे. या खुर्चीशी अनेक समजुती आणि भीतीदायक कथा जोडलेल्या आहेत.
थॉमस बुस्बीची शापित खुर्ची
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही खुर्ची एकेकाळी नॉर्थ यॉर्कशायरच्या थॉमस बुस्बीची होती. बुस्बीला या खुर्चीचा खूप शौक होता आणि तो अनेकदा त्यावर बसून आराम करत असे. मात्र, त्याच्या मृत्यूनंतर ही खुर्ची शापित मानली गेली. असे म्हटले जाते की, ज्याने कोणी या खुर्चीवर बसण्याचे धाडस केले त्याला अकाली मृत्यूला सामोरे जावे लागले. थॉमस बुस्बीच्या मृत्यूनंतर ही खुर्ची भीती आणि रहस्यमय कथांचे केंद्र बनली.
एक दिवस, थॉमस बुस्बीचे सासरे त्याच्या आवडत्या खुर्चीवर बसले. थॉमसला याचा इतका राग आला की, त्याने रागाच्या भरात आपल्या सासऱ्याची हत्या केली. यानंतर, थॉमसला 1704 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मरण्यापूर्वी, त्याने खुर्चीला शाप दिला की जो कोणी त्यावर बसेल तो जिवंत राहणार नाही.
त्यावेळी लोकांना वाटले की, थॉमसचे शापित शब्द एक विनोद आहेत, पण जो कोणी या खुर्चीवर बसला त्याचा मृत्यू झाला. माहितीनुसार, दुसर्या महायुद्धात काही सैनिक बुस्बीच्या खुर्चीवर बसले आणि त्यापैकी कोणीही जिवंत परत आले नाही. कारण काहीही असो, जो कोणी या खुर्चीवर बसला त्याने आपला जीव गमावला.
संग्रहालयात सुरक्षित ठेव
ही खुर्ची अनेक वेळा दुसरीकडे हलवण्यात आली, पण तिच्या शापाचा प्रभाव संपला नाही. अखेर, ती थिर्स्क संग्रहालयात सुरक्षित ठेवण्यात आली. संग्रहालयात, ती जमिनीवर ठेवण्याऐवजी, छतावरून लटकवण्यात आली आहे, जेणेकरून कोणीही चुकूनही त्यावर बसू नये. तसेच, ती शापित असल्याची कथाही येथे लिहिली आहे.
हे ही वाचा : गाजर हालवा समजून माकडाने खाल्ली लाल मिरची, अवस्था अशी झाली की... VIDEO पाहून भडकले नेटकरी
