सदर्न क्रायोनिक्सचे फिलिप रोड्स यांनी जाहीर केलं, की कंपनीने सिडनीतील एका माणसाला क्रायोजेनिक पद्धती वापरून यशस्वीरित्या फ्रीज केलं आहे. या महिन्याच्या सुरुवातीला या व्यक्तीचं वयाच्या 80 व्या वर्षी निधन झालं. फिलिपने एबीसी न्यूजला सांगितलं की, 'ते खूप तणावपूर्ण होतं. हीच गोष्ट मला आठवडाभर जागं ठेवत होती, कारण वेगवेगळ्या दिवशी अनेक वेगवेगळ्या प्रक्रिया करायच्या होत्या आणि अशा अनेक परिस्थिती होत्या, ज्याची जर आपण नीट तयारी केली नसली तर त्या चुकूही शकल्या असत्या.
advertisement
LadBible नावाच्या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, फिलिपने सांगितलं की, 'त्या वृद्ध व्यक्तीच्या कुटुंबाने अचानक आम्हाला कॉल केला. अशा स्थितीत सर्व तयारी आणि व्यवस्था करण्यासाठी आमच्याकडे जेमतेम आठवडाभराचा अवधी होता. 12 मे रोजी सिडनीच्या रुग्णालयात या व्यक्तीचा मृत्यू झाला, त्यानंतर कंपनीने ताबडतोब त्याचे शरीर गोठवण्याची प्रक्रिया सुरू केली. फिलिप यांनी सांगितलं की, या प्रक्रियेसाठी एकूण 88 हजार पौंड म्हणजेच सुमारे 92 लाख रुपये खर्च आला.
वृत्तानुसार, मृतदेह प्रथम रुग्णालयाच्या शीतगृहात नेण्यात आला आणि बर्फाने बांधण्यात आला. त्यानंतर तज्ञांनी त्याच्या पेशी टिकवण्यासाठी शरीरातून द्रव पदार्थ पंप केला. त्यानंतर शरीर कोरड्या बर्फात पॅक केलं गेलं आणि तापमान उणे 80 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आणलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या माणसाचा मृतदेह सदर्न क्रायोनिक्सच्या हॉलब्रूक सुविधेत आला तेव्हा त्याचे तापमान उणे 200 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आणले गेले आणि नंतर व्हॅक्यूम स्टोरेज पॉड म्हणून काम करणाऱ्या एका विशेष टाकीमध्ये ठेवण्यात आलं.
असं तंत्रज्ञान 250 वर्षांनंतर येऊ शकतं
एबीसी न्यूजच्या रिपोर्टनुसार, या संपूर्ण प्रक्रियेला एकूण 10 तास लागले आणि हे सर्व या वृद्ध व्यक्तीला भविष्यात पुन्हा जिवंत करता यावे यासाठी करण्यात आले. फिलिपचा दावा आहे की, 'तुमची इच्छा असल्यास, तुमच्या मेंदूला खऱ्या जगात निरोगी तरुण शरीरात रूपांतरित करण्यासाठी वैद्यकीय तंत्रज्ञान पुढील 250 वर्षांत उपलब्ध होईल. अशा स्थितीत तुम्हाला भूतकाळातील तसंच आभासी जगाचं सर्व ज्ञान असेल.'