हॉटेल रूममध्ये जाताच सगळ्यात आधी बेडखाली फेका पाण्याची बाटली; हे अतिशय गरजेचं, एअर होस्टेसने सांगितलं कारण
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
ती म्हणाली, यासाठी फक्त पाण्याची बाटली हातात असावी. जेव्हाही तुम्ही हॉटेलच्या खोलीत जाल तेव्हा सर्वप्रथम ही पाण्याची बाटली तुमच्या पलंगाखाली फेकून द्या.
नवी दिल्ली : आजकाल अनेकजण हॉटेल्समध्ये राहतात. तुम्हाला ऑफिसच्या कामासाठी दुसऱ्या शहरात जायचं असेल किंवा फिरायला तुम्ही कुठे गेले असाल तर, हॉटेल हे राहण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. पण कधी कधी छोट्याशा निष्काळजीपणामुळे आपण अडचणीत येतो. एका एअर होस्टेस ट्रॅव्हल हॅक्सने अलीकडेच अशा काही टिप्स शेअर केल्या आहेत, ज्यांचे पालन हॉटेलमध्ये राहणाऱ्यांनी केल्यास ते अडचणीत येण्यापासून वाचतील. प्रत्येक व्यक्तीला याची माहिती असणं गरजेचं आहे
न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, KLM रॉयल डच एअरलाइन्समध्ये कार्यरत फ्लाइट अटेंडंट एस्थर स्टुर्रस हिने ट्रॅव्हल सिक्युरिटी हॅक शेअर केलं आहे. ती म्हणाली, यासाठी फक्त पाण्याची बाटली हातात असावी. जेव्हाही तुम्ही हॉटेलच्या खोलीत जाल तेव्हा सर्वप्रथम ही पाण्याची बाटली तुमच्या पलंगाखाली फेकून द्या. पलंगाखाली कोणी लपलं असेल तर लगेच कळेल. पाण्याची बाटली त्याच्यावर आदळताच तो ओरडून पळून जाईल. आपण काही पेय किंवा पदार्थांच्या डब्याचाही वापर करू शकता
advertisement
ती म्हणाली की, हॉटेलमधील पलंगाखाली कोणीतरी लपल्याचं अनेकवेळा पाहिलं आहे. नंतर तो तुमच्यावर हल्लाही करू शकतो. तो तुमचा व्हिडिओ बनवू शकतो किंवा तुमचे सामान घेऊन पळून जाऊ शकतो. अशा वेळी हा उपाय अतिशय उपयुक्त आहे. साप वगैरे असला तरी तो बाहेर येईल. तुमच्या सुरक्षिततेसाठी हे खूप महत्वाचं आहे. पलंगाखाली वाकून पाहण्याची गरज नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये कोणताही पैसा खर्च करावा लागणार नाही.
advertisement
काही सोशल मीडिया युजर्सनी या हॅकचं कौतुक केलं, मात्र अनेकांनी तिला वेडं म्हटलं. एकाने विचारलं, तुमच्या पलंगाखाली किती वेळा घुसखोर सापडला आहे? हे वेडेपणासारखं वाटतं. दुसऱ्याने लिहिलं, चांगला मार्ग. असं करण्यात काय नुकसान आहे? उंदरासारखं काही असलं तरी तेदेखील बाहेर पडेल. इतरही अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 27, 2024 7:12 AM IST
मराठी बातम्या/Viral/
हॉटेल रूममध्ये जाताच सगळ्यात आधी बेडखाली फेका पाण्याची बाटली; हे अतिशय गरजेचं, एअर होस्टेसने सांगितलं कारण