छोट्या-मोठ्या तांत्रिक कारणांमुळे गाड्या वेळेत धावत नाहीत आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. 15 ते 30 मिनिटांचा उशीर तर नेहमीचाच झालाय, पण कधी कधी गाड्या तासन्तास लेट होतात. अशावेळी बहुतेक प्रवाशांच्या मनात एकच प्रश्न येतो. ट्रेन लेट झाली तर तिकीटाचे पैसे परत मिळतात का?
तर होय, मिळतात… पण काही ठराविक नियम आणि अटींसह
advertisement
ट्रेन लेट झाल्यास कधी रिफंड मिळतो?
जर ट्रेन 3 तासांपेक्षा जास्त उशिरा होणार असल्याचं रेल्वेकडून जाहीर केलं आणि तुम्ही प्रवास रद्द करण्याचा निर्णय घेतला, तर तिकीटाची पूर्ण रक्कम परत मिळू शकते. मात्र हा नियम फक्त सामान्य आणि आरक्षित तिकिटांवरच लागू होतो.
तत्काळ तिकिटांसाठी नियम वेगळे
जर तुमचं तिकीट तत्काळ (Tatkal) असलं आणि ते कन्फर्म झालं असेल, तर ट्रेन उशिरा आली तरी रिफंड मिळत नाही.
रिफंड कसा मागायचा?
गाडी उशिरा असल्यामुळे प्रवास रद्द करावा लागल्यास तुम्हाला TDR (Ticket Deposit Receipt) फाईल करावी लागते. हे तुम्ही IRCTC च्या वेबसाइटवर किंवा Rail Connect App वरून ऑनलाइन करू शकता. फॉर्ममध्ये गाडी उशिरा असल्याचा उल्लेख करणं आवश्यक आहे.
पैसे केव्हा मिळतात?
साधारणपणे 5 ते 7 दिवसांत रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते. काही वेळा विलंब झाला तर जास्तीत जास्त 90 दिवसांच्या आत रिफंड मिळावा असा नियम आहे. जर त्या कालावधीत रक्कम मिळाली नाही, तर तुम्ही तक्रार दाखल करू शकता.